AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर 200 कोटीची संपत्ती दान. एका हातात कटोरा, दोन जोडी कपडे; दाम्पत्याचं गृहत्यागाचं कारण काय ?

कुणाच्या आयुष्याला कधी टर्निंग पॉइंट मिळेल काही सांगता येत नाही. कालपर्यंत रंगारंग पार्टी, आलिशान घर, कार, परदेशवारी असं आयुष्य जगणाऱ्या एका जोडप्याने अचानक संन्यासी होण्याची निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी त्यांची 200 कोटी रुपयांची संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील हा मोठा व्यावसायिक आहे.

अखेर 200 कोटीची संपत्ती दान. एका हातात कटोरा, दोन जोडी कपडे; दाम्पत्याचं गृहत्यागाचं कारण काय ?
| Updated on: Apr 16, 2024 | 2:29 PM
Share

गुजरातमधील एका कंन्स्ट्रक्शन बिझनेसमन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. भावेश भाई भंडारी असं या उद्योजकाचं नाव आहे. त्याने 200 कोटीची संपत्ती दान करण्याचा निर्णय जाहीर केला होता. अखेर त्यांनी ही संपत्ती दान केली आहे. तसेच पत्नीसोबत संन्यास दीक्षा घेणार आहेत. लग्झरी आयुष्य जगणारे भावेशभाई आणि त्यांची पत्नी आता एका हातात कटोरा घेऊन भिक्षा मागून खाणार आहेत. जवळ फक्त दोन जोडी कपडे ठेवणार असून जमिनीवर झोपणार आहेत.

भावेशभाई भंडारी यांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी दान केली आहे. ही पुंजी थोडी थोडकी नसून 200 कोटीची आहे. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने संपत्ती दान करून संन्यास दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संपत्ती दान केली आहे. आयुष्यभर लग्झरी आयुष्य उपभोगणारं हे दाम्पत्य आता पंख्याशिवाय, कुल, एसी शिवाय राहणार आहेत. जमिनीवर झोपणार आहेत. पायी चालणार आहेत आणि लोकांकडून भिक्षा मागून त्यावर पुढील आयुष्य घालवणार आहेत.

गुजरातमध्ये मोठा बिझनेस

भावेशभाई भंडारी हे गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगरमध्ये राहतात. अहमदाबादसह संपूर्ण गुजरातमध्ये त्यांचा बिझनेस फैलावलेला आहे. भावेशभाई त्यांच्या कुटुंबासोबत चांगलं आयुष्य जगत होते. पण आता त्यांना संन्यासी बनून देवाची आराधना करायची आहे. त्यामुळे त्यांनी पत्नीशी विचारविनिमय केला आणि संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. ते जैन संन्यासी झाले आहेत. त्यांची पत्नीही संन्यासी झाली आहे. भावेश यांचं कुटुंब जैन मुनिंशी नेहमी जोडलेलं होतं.

हिम्मतनगरमध्ये पार पडलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात भंडारी दाम्पत्याने 200 कोटीची संपत्ती दान केली. त्यानंतर त्यांनी जैन संन्यासी बनण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्यासोबत 35 लोकांनी संन्यासी होण्याची इच्छा व्यक्त केली. 22 एप्रिल रोजी त्यांना जैन संन्यासी होण्याची दीक्षा दिली जाणार आहे.

मुलं आधीच संन्यासी झाले

भावेशभाईंच्या मुलांनी आधीच संन्यास घेतला आहे. 2022 मध्ये त्यांच्या 16 वर्षाच्या मुलाने आणि 19 वर्षाच्या मुलीने संन्यास घेतला. आता दोघा पती पत्नीनेही मुलांच्याच मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

लाकडाच्या फळीवर झोपणार

जैन साधूंची तपस्या अत्यंत कठिण असते. जैन साधू कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रीक वस्तूंचा वापर करत नाहीत. ते पंख्याची हवा सुद्धा घेत नाहीत. जमिनीवर चटाई टाकून किंवा लाकडाच्या फळीवर ते झोपतात. पायी चालतात आणि भिक्षा मागून खातात.

निर्णय का घेतला?

भावेशभाई यांनी संन्यासी होण्याचा निर्णय का घेतला याची माहिती दिली आहे. आपल्या मुलांपासून प्रेरणा घेऊनच संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला. मुलांनीही भौतिक आसक्तींचा त्याग करून तपाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचं भावेशभाई म्हणतात. साधू झाल्यावर त्यांच्याकडे जेवणासाठी एक कटोरा असेल. तसेच दोन सफेद वस्त्रे असतील. एक सफेद झाडू असेल.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.