जम्मू आणि काश्मीर : शोपियान भागात जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील शोपियान परिसरात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. आज सकाळी शोपियानच्या सुगन भागातही चकमक झाली.

जम्मू आणि काश्मीर : शोपियान भागात जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
Jammu kashmir File Photo

श्रीनगरजम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) शोपियान (Shopian) परिसरात सुरक्षा बलाचे (Security Forces) जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. आज सकाळी शोपियानच्या सुगन भागातही चकमक झाली. यावेळी जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. (Jammu and Kashmir | Two terrorists killed in an encounter with security forces in Sugan area of Shopian)

सुरक्षाबल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने एका विशेष सुचनेच्या आधारे सुगन भागात सकाळी शोधमोहीम राबवली. त्यामध्ये त्यांना दहशतवादी लपलेल्या जागेची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांचा अड्डा घेरला. बाहेर पोलीस आणि जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. जवानांनीदेखील त्यास प्रत्युत्तर दिले.

जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शोपियानमधील सुगन भागात अजूनही चकमक सुरु आहे. पोलीस आणि जवान तिथे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत आहेत.

18 जुलैला याच भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यावेळी कथितरित्या मारले गेलेल्या तीन नागरिकांचे मृतदेह अंतिम संस्कारांसाठी त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहेत. हे तीनही नागरिक मुळचे जम्मूमधील संभागच्या राजौरी जिल्ह्यातील होते. बारामुल्ला जिल्ह्यातील गंतमुल्ला येथील एका स्मशानभूमी परिसरात त्यांचे मृतदेह होते. तब्बल 70 दिवसांनंतर त्यांचे मृतदेह तिथून काढण्यात आले.

पुलवामात दोन दहशतवादी ठार

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अंवतीपोरा भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले होते. सुरक्षा बलाच्या जवानांना माहिती मिळाली होती की, येथील सम्बोरा क्षेत्रात दहशतवादी लपले आहेत. त्यानंतर जवानांनी त्या भागात सर्च ऑपरेशन राबवले. याचदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. तेव्हा झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

संबंधित बातम्या 

जम्मू-काश्मीरमधल्या पंपोरमध्ये दहशतवादी हल्ला, दोन CRPF जवान शहीद, तिघे जखमी

Akshardham Terror Attack | अक्षरधाम मंदिर दहशतवादी हल्ल्याचा थरार मोठ्या पडद्यावर, लवकर सिनेमा भेटीला

(Jammu and Kashmir | Two terrorists killed in an encounter with security forces in Sugan area of Shopian)

Published On - 10:38 am, Wed, 7 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI