मॅच फिनिशर धोनी सध्या काश्मीरमध्ये आहे, Article 370 वर मजेदार मीम्स

मोदी सरकारने जम्मू काश्मीरबाबत ऐतिहासिक पाऊल टाकलं. जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir Article 370) आता केंद्रशासित घोषित करण्यात आलं आहे. कलम 370 हटवल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

मॅच फिनिशर धोनी सध्या काश्मीरमध्ये आहे, Article 370 वर मजेदार मीम्स

Jammu Kashmir LIVE श्रीनगर/नवी दिल्ली : मोदी सरकारने जम्मू काश्मीरबाबत ऐतिहासिक पाऊल टाकलं. जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir Article 370) आता केंद्रशासित घोषित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर कलम 370 (Article 370) हटवून विशेषाधिकारही काढून टाकण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरचं विभाजन करुन जम्मू काश्मीर आणि लडाख ही दोन केंद्रशासित राज्यांच्या निर्मितीची घोषणा केली. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे मात्र लडाखमध्ये विना विधानसभा केंद्रशासित राज्य असेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितलं. कलम 370 हटवल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

कलम 370  हटवल्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावावरुनही अनेक मीम्स व्हायरल होत आहे. धोनीने  2 महिन्यांची सुट्टी घेत सैन्यात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार धोनी हा 31 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत काश्मीरमध्ये सैन्यातील आपले कर्तव्य पार पाडत आहे.  मात्र कलम 370 हटवल्यानंतर काहींनी धोनीवरुन मीम बनवले आहेत. “धोनीला उगाचच काश्मीरमध्ये पाठवण्यात आलेले नाही, धोनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी गेला आहे” असे मीम्स तयार केलेत. तर काहींनी “धोनीने क्रिकेटप्रमाणे इतर ठिकाणीही उत्तम फिनिशर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे”, असे मीम्स  कलम 370 हटवल्यानंतर धोनीच्या नावाने  व्हायरल होत आहे.

तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी जम्मू काश्मीरमध्ये आता तुम्ही घर खरेदी करु शकता, अशा जाहिरातीही बनवल्या आहेत. त्याशिवाय मान्सूनच्या पहिल्या सोमवारी म्हणजे 22 जुलैला चंद्रयान पाठवले. दुसऱ्या सोमवारी म्हणजे 29 जुलैला तिहेरी तलाक कायदा रद्द केला. त्यानंतर आज म्हणजेच तिसऱ्या सोमवारी कलम 370 आणि 35 A रद्द केले. त्यानंतर आता चौथा सोमवार उरला आहे. तेव्हा कदाचित पाकिस्तानच भारताचा हिस्सा होऊ शकतो अशा प्रकारचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Published On - 5:27 pm, Mon, 5 August 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI