Farooq Abdullah : काश्मीरमध्ये 7 निर्दोष लोकांच्या हत्येनंतर फारुक अब्दुल्ला पाकिस्तानवर खवळले, म्हणाले….
Farooq Abdullah : जम्मू-कश्मीरच्या गांदरबल येथील गगनगीर भागात दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात टनलमध्ये काम करणाऱ्या मजुरांना लक्ष्य करुन गोळीबार करण्यात आला. यात 6 मजुरांचा मृत्यू झाला. यात एक डॉक्टरने सुद्धा प्राण गमावले.
जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नॅशनल कॉन्फ्रेंसचे चीफ फारूक अब्दुल्ला खवळले आहेत. त्यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. “काश्मीर पाकिस्तान बनणार नाही. आम्हाला सुखाने राहू द्या. जर 75 वर्षात काश्मीर पाकिस्तान बनला नाही, तर आता काय बनणार?. आम्हाला आमचं भाग्य बनवायच आहे. ते या दहशतवादाने बनणार नाही” असं फारूक अब्दुल्ला म्हणाले. एनसी पार्टीचे प्रमुख फारूक अब्दुल्ला म्हणाले की, “हे खूप वेदनादायी आहे. अनेक गरीब मजूर जे कमाईसाठी इथे येतात. त्या बिचाऱ्या लोकांना या नराधमांनी शहीद केलं. त्यात आमचे एक डॉक्टर साहेब होते. जे लोकांची सेवा करायचे. त्यांचा सुद्धा मृत्यू झाला”
“असं करुन या नराधमांना काय मिळणार?. त्यांना असं वाटतं का, हे असं करुन पाकिस्तान बनेल. आम्हाला पुढे जायचं आहे. आम्हाला या अडचणीतून मार्ग काढायचाय. मी पाकिस्तानी नेत्यांना आवाहन करीन की, त्यांना खरच भारतासोबत मैत्री हवी असेल, तर हे सर्व बंद करा” असं फारूक अब्दुल्ला म्हणाले. “काश्मीर पाकिस्तान बनणार नाही. आम्हाला प्रगती करु दे. आम्हाला जगू द्या. असे हल्ले बंद करायची वेळ आली आहे. याचे परिणाम खूप गंभीर असतील. पाकिस्तानसोबत चर्चा कशी होणार? तुम्ही आमच्या निरपराध लोकांना मारणार आणि बोलणार चर्चा करां” असं फारुक अब्दुल्ला म्हणाले.
#WATCH | Gagangir terror attack | Srinagar, J&K: NC President Farooq Abdullah says, “This attack was very unfortunate… Immigrant poor labourers and a doctor lost their lives. What will the terrorists get from this? Do they think they will be able to create a Pakistan here… We… pic.twitter.com/2lHenWlMVk
— ANI (@ANI) October 21, 2024
पुन्हा काश्मीर खोऱ्यात तणाव वाढला
जम्मू-कश्मीरच्या गांदरबल येथील गगनगीर भागात दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात टनलमध्ये काम करणाऱ्या मजुरांना लक्ष्य करुन गोळीबार करण्यात आला. यात 6 मजुरांचा मृत्यू झाला. यात एक डॉक्टरने सुद्धा प्राण गमावले. जम्मू-काश्मीरमध्ये नुकतचं नवीन सरकार स्थापन झालय. उमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर हा हल्ला झाल्याने पुन्हा काश्मीर खोऱ्यात तणाव वाढला आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सुद्धा या हल्ल्याचा निषेध केला आहे.