दोन डोकं असलेल्या बाळाचा जन्म, रुग्णालयातून जन्मदात्यांचा पळ, डॉक्टरांचा मोठा निर्णय

डॉक्टरांच्या टीमने दोन तासांच्या ऑपरेशननंतर मुलाच्या डोक्यातील अतिरिक्त भाग काढून टाकला आहे. पुढील 3 दिवस नवजात बालक डॉक्टरांच्या देखरेखीखाली असेल. मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्याची सुटका करण्यात आली आहे.

दोन डोकं असलेल्या बाळाचा जन्म, रुग्णालयातून जन्मदात्यांचा पळ, डॉक्टरांचा मोठा निर्णय
व्याधीग्रस्त बाळाला सोडून आई-वडिलांचा पळ


रांची : झारखंडच्या रिम्स (RIMS) रुग्णालयामध्ये दोन डोकं असलेल्या बाळाचा जन्म झाल्याची अनोखी घटना समोर आली आहे. मात्र निर्दयी जन्मदात्री आपल्या तान्ह्या बाळाला जन्म देऊन पळून गेली. बाळाला जन्मतःच ऑसिपिटल मेनिंजो इंसेफेलॉसिल (Occipital Meningoencephalocele) या आजाराने ग्रासले आहे. या आजारात डोक्याचा मागचा भाग बाहेर येऊन थैलीसारखा होऊन दोन डोक्यांसारखा दिसतो. हा भाग मेंदू आणि त्वचेलाही जोडलेला असतो.

बाळाच्या आई-बाबांचा रुग्णालयातून पळ

बाळाची अशी अवस्था पाहून सख्ख्या आई-बापाने त्याला रुग्णालयात सोडून गुपचूप पळ काढला. या प्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांशी संपर्क साधला. तपासात त्यांचा पत्ताही बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर डॉक्टरांच्या टीमने त्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांतर्फे चालवलेली जाणारी एनजीओ सध्या अर्भकाची काळजी घेत आहे.

दहा दिवस डॉक्टरांच्या निगराणीत

रिम्समधील न्यूरो सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार “डॉक्टरांच्या टीमने दोन तासांच्या ऑपरेशननंतर मुलाच्या डोक्यातील अतिरिक्त भाग काढून टाकला आहे. पुढील 3 दिवस नवजात बालक डॉक्टरांच्या देखरेखीखाली असेल. मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्याची सुटका करण्यात आली आहे. एका एनजीओने मुलाची जबाबदारी घेतली आहे. सध्या त्याला चमच्याने दूध दिले जात आहे, त्याला 10 दिवसांनी डिस्चार्ज मिळणार आहे.”

ऑसिपिटल मेनिंजो इंसेफेलॉसिल म्हणजे काय?

ऑसिपिटल मेनिंजो इंसेफेलॉसिल हा एक जन्मजात आजार आहे, ज्यामध्ये कवटीच्या हाडातून काही भाग बाहेर येतो. तो डोक्याच्या बाहेरील बाजूस थैलीप्रमाणे साठवला जातो. डोक्याच्या भागाबरोबरच तो त्वचेलाही जोडलेला असतो. बाळाला आयुष्यभर याचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच इतर आजार होण्याची शक्यता असते. बाळाचा पाठीचा कणाही बाहेर येण्याची शक्यता असते. याला मेनिंजो मायनोसिल म्हणतात.

संबंधित बातम्या :

रात्रीच्या अंधारात सायकलस्वाराचा अपघात, शिवसेनेच्या आमदाराकडून प्रेमाची फुंकर, लोकांनाही केलं आवाहन

महिलेसोबत तलाठी कार्यालयातच अश्लील चाळे, तलाठ्याने मित्रांनाही बोलावले, गावकऱ्यांनी दिला चोप

देहव्यापाराच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, एटीएसनं 11 बांग्लादेशींना घेतले ताब्यात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI