मोठी बातमी! आता मदरशांमध्ये घुमणार ऑपरेशन सिंदूरचा आवाज, नवा निर्णय काय?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेश सिंदूर राबवलं, या मध्ये दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली.

पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला, ऑपरेशन सिंदूरची पाकिस्तानने चांगलीच धास्ती घेतली. कर्नल सोफिया कुरैशी यांची ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका होती.
दरम्यान आता जोधपूर मदरसा बोर्ड एक ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. या अंतर्गत भारतीय सैन्याची साहसी मोहीम ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबतच्या माहितीचा समावेश हा मदरसा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे. याबाबत बोलताना बोर्डाचे अध्यक्ष एमडी चोपदार म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमधून मुस्लिम मुलींनी प्रेरणा घ्यावी, त्यांना कर्नल सोफिया कुरैशी यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी मदरसा अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरबाबतच्या माहितीचा समावेश करण्याचा विचार सुरू आहे. या निर्णयामुळे केवळ देशभक्तीच वाढणार नाही, तर मदरसामध्ये शिकणाऱ्या मुलींना प्रेरणा मिळेल, असं चोपदार यांनी म्हटलं आहे.
एमडी चोपदार, जे स्वतः एका सैन्य कुटुंबातील आहेत, यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी स्वत: एका सैन्य कुटुंबातील आहे. देशासाठी त्याग करणं, बलिदान देणं काय असतं हे मला चांगलं माहीत आहे. मला वाटतं की जर आम्ही ऑपरेशन सिंदूरबाबत मुलींना माहिती दिली तर त्या देखील निश्चितपणे कर्नल सोफिया कुरैशी यांच्याप्रमाणेच देशाचं नाव उंचावतील, त्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळेल, असं चोपदार यांनी म्हटलं आहे.
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तामध्ये प्रचंड तणाव वाढला. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं, भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 ठिकाणं उद्ध्वस्त झाले, तसेच 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने देखील भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं हा हल्ला परतून लावला, परंतु त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं.