IIT शिक्षित पहिले आमदार ते संरक्षणमंत्री, पर्रिकरांचा प्रवास

IIT शिक्षित पहिले आमदार ते संरक्षणमंत्री, पर्रिकरांचा प्रवास

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. गोव्यातील राहत्या घरी मनोहर पर्रिकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून मनोहर पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर ही झुंज अपयशी ठरली आणि भारतीय राजकारणातील सुस्वभावी नेता हरपला.

13 डिसेंबर 1955 रोजी मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातील मापुसा येथे जन्म झाला. मार्गोओ येथील लोयोला हायस्कूल येथे शिक्षण घेतलं. त्यांचं माध्यमिक शिक्षण मराठी भाषेतून झालं. पुढे 1978 साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.

आयआयटी शिक्षित मनोहर पर्रिकर हे भारतातील पहिले आमदार आहेत.

मनोहर पर्रिकर यांनी सुरुवातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केलं. तरुण वयातच ते संघात मुख्य शिक्षक बनले. पुढे राजकारमात त्यांनी भाजपमधून प्रवेश घेतला.

1994 साली पहिल्यांदा पर्रिकर गोवा विधानसभेत आमदार म्हणून गेले. जून 1999 ते नोव्हेंबर 1999 या काळात गोव्यात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2000 रोजी मनोहर पर्रिकर पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पुढे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठा कालावधी गोव्यात घालवला.

2014 साली केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर मनोहर पर्रिकर हे देशाचे संरक्षणमंत्री झाले. त्यासाठी उत्तर प्रदेशातून ते राज्यसभेवर गेले. मात्र, गोव्यात राजकीय त्रिशंकु स्थिती निर्माण झाल्याने, पर्रिकर पुन्हा गोव्यात परतले आणि मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली. मात्र, याच काळात त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. त्यामुळे वारंवार उपचारासाठी परदेशात जावं लागत होतं.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI