AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्योती मल्होत्रा, जसबीरचे अनेक कांड समोर येणार, NIA च्या एका निर्णयानं सगळा पर्दाफाश होणार!

Jyoti Malhotra And Jasbir Singh : ज्योती मल्होत्रा आणि जसबीर सिंह यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

ज्योती मल्होत्रा, जसबीरचे अनेक कांड समोर येणार, NIA च्या एका निर्णयानं सगळा पर्दाफाश होणार!
jyoti malhotra and jasbir singh
| Updated on: Jun 07, 2025 | 3:56 PM
Share

Jyoti Malhotra And Jasbir Singh : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगलेच बिघडले. या दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्लेदेखील केले होते. याच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतात परेलेले गुप्तहेरांचे जाळे उघडे पडले. याच हेरामध्ये प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिदेखील असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांच्या तसेच इतर तपास संस्थांच्या कचाट्यात इतरही यूट्यूबर्स आले आहेत. यामध्ये जसबीर सिंह याचाही समावेश आहे. असे असतानाच आता तपास संस्थांच्या तपास मोहिमेविषयी एक मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता एनआयएमार्फत ज्योती मल्होत्रा आणि जसबीर सिंह या दोघांनाही समोरासमोर बसवून त्यांची एकत्र चौकशी केली जाणार आहे.

दोघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याचा संशय

या दोघांनाही समोरासमोर बसवून त्यांची एकत्र चौकशी केल्यामुळे हेरगिरीचे बरेच अज्ञात पैलू समोर येतील, अशी तपास संस्थांना आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार जसबीर सिंह आणि ज्योती मल्होत्रा हे एकमेकांच्या संपर्कात होते. जसबीर याला पंजाबच्या मोगा येथून अटक करण्यात आली आहे. तर ज्योती मल्होत्री ही मूळची हरियाणाय येथील असून तिला हिसार येथून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

म्हणून होणार दोघांचीही चौकशी

या दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते, असा तपास संस्थांना संशय आहे. तसेच या दोघांचेही पाकिस्तानच्या आयएसआय संस्थेचा अधिकारी दानिश सोहेल, पाकिस्तानू दूतापवासात तैनात असलेला अधिकारी उमर शहरयार, पाकिस्तानमधील निवृत्त पोलीस अधिकारी नासीर ढिल्लो, लाहोर येथील टूर अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय करणारा वाली नौशाबा (आयएसआय एजंट) यांच्याही संपर्कात हे दोघे होते, असा संशय तपास संस्थांना आहे. वर उल्लेख केलेल्या याच अधिकाऱ्यांनी ज्योती आणि जसबीर यांची आयएसआयच्या अधिकाऱ्यांशी भेट घडवून आणली होती, अशीही माहिती समोर आली आहे. या दोघांच्याही विरोधात भारतीय तपास संस्थांच्या हाती ठोस पुरावे लागलेले आहेत. याच कारणामुळे ज्योती आणि जसबीर या दोघांचीही चौकशी करून आणखी पुरावे मिळवण्याचा प्रयत्न तपास संस्थांकडून केला जात आहे.

जसबीर यांच्या मोबाईलची केली जात आहे तपासणी

जसबीर सिंह सध्या भारतीय तपास संस्थांच्या ताब्यात आहे. त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याच्या फोनमधील मोबाईल नंबर, चॅटिंग तसेच इतर माहिती डिलीट करण्यात आली आहे. हीच माहिती परत मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी जसबीर याचा मोबाईल हा फॉरेन्सिक लॅबकडे सोपवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जसबीर हा कोणा-कोणाच्या संपर्कात होता, याचाही तपास संस्था शोध घेत आहेत.

पाच यूट्यूबर्स रडारवर

दरम्यान, ज्योती मल्होत्रा कचाट्यात सापडल्यानंतर पोलिसांनी इतरांनाही अटक केलेलं आह. मिळालेल्या माहितीनुसार आणखी पाच सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्स तसेच यूट्यूबर्स यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. हे सर्व ज्योतीच्या संपर्कात होते.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.