उज्जैनमधील बाबा महाकाल यांच्या शाही मिरवणुकीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व त्यांचे पुत्र महाआर्यमन सिंधिया यांचा सहभाग
आज (सोमवार) उज्जैनमध्ये बाबा महाकाल यांची शाही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्वाल्हेर राजघराण्याचे युवराज महाआर्यमन सिंधिया आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे उपस्थित होते.

आज (सोमवार) उज्जैनमध्ये बाबा महाकाल यांची शाही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्वाल्हेर राजघराण्याचे युवराज महाआर्यमन सिंधिया आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे उपस्थित होते. यावेळी या दोघांनी पूजा विधी केले. या दोघांनी ग्वाल्हेर राजघराण्याची 300 वर्षांची परंपरा अभिमानाने आणि भक्तीने पाळली. आजच्या या मिरवणुकीला लाखो लोक सहभागी झाले होते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सिंधिया राजघराण्याचे 14 वे वंशज असलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे आज उज्जैनमधील बाबा महाकाल यांच्या शाही मिरवणुकीत सहभागी झाले होते. ही परंपरा राबवली सिंधिया काळात सुरू झाली होती. 1732 मध्ये, सुमारे 300 वर्षांपूर्वी सिंधिया घराण्याचे राणोजी सिंधिया यांनी महाकालेश्वर मंदिराचे नूतनीकरण केले होते.
नूतनीकरण झाल्यानंतर 500 वर्षांपासून बंद असलेले मंदिर पुन्हा उघडण्यात आले होते आणि भगवान महाकाल यांची मिरवणूक पुन्हा सुरू झाली होता. 500 वर्षांनंतर सिंहस्थ कुंभ देखील सुरू झाला होता. तेव्हापासून मराठा साम्राज्यातील सिंधिया राजघराण्यातील कोणीतरी एक सदस्य भगवान महाकालच्या मिरवणुकीत भाग घेत असतो. हीच परंपरा सिंधिया कुटुंब अजूनही ही परंपरा चालवत आहे.
आज ज्योतिरादित्य सिंधिया आणि महाआर्यमन सिंधिया इंदूरमध्ये आले होते. हे दोघे इंदूरमधील बापट हॉस्पिटलच्या मागे असलेल्या ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एमपीसीए वार्षिक पुरस्कार कार्यक्रमात सहभागी झाले होते. यानंतर त्यांनी उज्जैनमध्ये आयोजित शाही मिरवणुकीत भाग घेतला.
जय श्री महाकाल 🚩🙏
आज, पवित्र नगरी उज्जैन पहुंचकर प्रसिद्ध गोपाल मंदिर में त्रिलोकीनाथ, राजाधिराज बाबा महाकाल की शाही सवारी में सम्मिलित होकर बाबा के दिव्य दर्शन एवं पूजन का सौभाग्य प्राप्त हुआ।
भगवान महाकाल की राजसी सवारी के स्वागत की परंपरा सिंधिया परिवार द्वारा सैकड़ों वर्ष… pic.twitter.com/bGf7vUI4fA
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) August 18, 2025
याबाबत ट्वीट करताना मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले की, ‘आज पवित्र उज्जैन शहरात आल्यानंतर मला प्रसिद्ध गोपाळ मंदिरात त्रिलोकीनाथ, राजाधिराज बाबा महाकाल यांच्या शाही मिरवणुकीत सामील होण्याचा आणि बाबांचे दिव्य दर्शन आणि पूजा करण्याचे सौभाग्य मिळाले.
भगवान महाकाल यांच्या शाही मिरवणुकीचे स्वागत करण्याची परंपरा शेकडो वर्षांपूर्वी सिंधिया कुटुंबाने सुरू केली होती. आज मला तीच परंपरा पुढे नेण्याचा अभिमान वाटतो. मी बाबा महाकाल यांना प्रार्थना करतो की त्यांनी सर्व देशवासीयांवर त्यांची कृपा आणि आशीर्वाद नेहमीच ठेवावा.
