AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPS अधिकाऱ्याचा चौथ्यांदा राजीनामा, कारवाई केल्यानं सरकारकडून छळ होत असल्याचा सनसनाटी आरोप!

मुदतपूर्व बदली करण्यामागचा सरकारचा हेतू हा सार्वजनिक हितासाठी घेतलेला नसून फक्त मला त्रास देण्यासाठी घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.

IPS अधिकाऱ्याचा चौथ्यांदा राजीनामा, कारवाई केल्यानं सरकारकडून छळ होत असल्याचा सनसनाटी आरोप!
नेमका कुणी दिला राजीनामा?Image Credit source: Twitter
| Updated on: May 11, 2022 | 7:31 AM
Share

कर्नाटक : कर्नाटक सरकारकडून (Karnataka Government) होणाऱ्या छळाला वैतागून एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्यानं तडकाफडकी राजीनामा दिला. तब्बल चौथ्यांदा राजीनामा देणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याचं नाव पी रवींद्रनाथ (IPS P Ravindranath) आहे. कर्नाटक सरकारवर पी रवींद्रनाथ यांनी सनसनाटी आरोप केले आहे. पोलीस महासंचालक असलेल्या डॉ. पी रवींद्रनाथ यांच्या राजीनाम्यानं कर्नाटकच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली. एखाद्या सिनेमात दाखवण्यात येणाऱ्या सीनप्रमाणे पोलीस अधिकाऱ्याची (Police Officer) बदली झाली. त्यावर तीव्र नाराजी पी रवींद्रनाथ यांनी व्यक्त केली. कर्नाटक राज्य पोलीस दलाच्या प्रशिक्षण शाखेत त्यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी नाराजी दर्शवत राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्यामध्ये त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आणि संताप व्यक्त केलाय. पोलीस महासंचालक असलेल्यी पी रवींद्रनाथ यांनी बोगस जात प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई केली होती. तसंच यासाठी त्यांनी एक संरक्षण कक्ष स्थापन करण्याचा सल्लाही सरकारला दिला होता.

म्हणून बदली झाली?

अनुसूचित जात आणि जमाती अत्याचार प्रतिबंध 1995 च्या नियमांनुसार त्यांनी तसा आदेश जारी करण्यात यावा, अशी विनंती सरकारला केली होती. मात्र सरकारच्या कारभारावरच त्यांनी नाराजी आणि दुःख व्यक्त केलंय. कर्नाटकच्या मुख्य सचिवांना त्यांनी आपला राजीनामा दिलाय.

वाचा राजीनाम्यात नेमकं काय म्हटलं?

सनसनाटी आरोप

मला त्रास देण्यासाठी माझी बदली करण्यात आली, असंही त्यांनी म्हटलंय. आपल्या राजीनाम्यात त्यांनी तसा उल्लेख केलाय. मुदतपूर्व बदली करण्यामागचा सरकारचा हेतू हा सार्वजनिक हितासाठी घेतलेला नसून फक्त मला त्रास देण्यासाठी घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.

याआधीही दिलाय राजीनामा

पी रवींद्रनाथ हे राजीनामा देण्यासाठी आणि नंतर तो मागे घेण्यासाठीही ओळखले जातात. याआधी त्यांनी तब्बल तीन वेळ राजीनामा दिला आहे. 2008, 2014 आणि 2020 मध्येही त्यांनी राजीनामा दिलेला होता. 1989च्या बॅचचे ते पोलीस अधिकारी आहेत. याआधी सेवाज्येष्ठतेत डावललं गेल्यानं त्यांनी राजीनामा दिलेला. तर त्याआधी काही लोकांनी आपला छळ केल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी राजीनामा दिल्यानं चर्चांना उधाण आलंय.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.