खिशात दोनशेची नोट ठेवा अन् हा संपूर्ण देश फिरून या, भारताच्या 200 रुपयांची किंमत तब्बल 1000000 रुपये
डॉलर, युरो हे चलन भारतीय रुपयाच्या तुलनेत खूप मजबूत आहे, पण जागाच्या पाठीवर असे देखील काही देश आहेत, तेथील चलन हे भारतीय रुपयाच्या तुलनेत खूपच कमकुवत आहे, अशाच एका देशाची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

जगातील प्रत्येक देशात चलनाची किंमत वेगवेगळी असते, अमेरिकन चलन असलेलं डॉलर, युरो तसेच ब्रिटनमधील पाउंड सारखे चलन भारतीय रुपयाच्या तुलनेत खूप जास्त मजबूत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका सारख्या देशातील चलन भारतीय रुपयाच्या तुलनेत कमजोर आहे. नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकामधील चलनाच्या तुलनेत भारतीय चलनाची किंमत ही तीन ते चार पटींनी अधिक आहे. मात्र जगाच्या पाठीवर असा देखील एक देश आहे, जिथे भारतीय रुपयाची ताकद ही दोन -तीन पटीने नाहीतर शेकडो पटीने अधिक आहे. या देशाचं नाव आहे इराण, इराणमध्ये जी अधिकृत मुद्रा वापरली जाते, तिला इराणी रियाल असं म्हटलं जातं. व्हाईस कॉम च्या एका रिपोर्टनुसार सध्या भारताच्या एका रुपयाची किंमत इराणमध्ये 463.11 इराणी रियाल एवढी आहे. याचाच अर्थ असा की भारताच्या 216 रुपयांची किंमत जवळपास इराणमध्ये दहा लाख इराणी रियाल एवढी होती. याचाच आणखी एक अर्थ असा देखील होतो, की इराणचे दहा लाख रियाल हे भारतात दोनशे रुपये होतात. सध्या इराणची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात कमकुवत अर्थव्यवस्था बनली आहे.
इराणची अर्थव्यवस्था एवढी का घसरली?
इराणच्या अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने घसरण सुरूच आहे. गेल्या काही वर्षांपासून इराणची अर्थव्यवस्था ही प्रचंड दबावाखाली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेनं इराणवर अनेक प्रतिबंध घातले आहेत. इराणच्या अर्थव्यवस्थेची घसरण सुरू असतानाच आता इराणवर आणखी एक मोठं संकट आलं ते म्हणजे वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून या देशात प्रचंड मोठं जनआंदोलन उभं राहिलं, देशात प्रचंड अस्थिर वातावरण निर्माण झालं, त्यामुळे चलनाच्या मुल्यात प्रचंड प्रमाणत घसरण झाली आहे. इराणमध्ये एका अमेरिकन डॉलरची किंमत ही जवळपास 14 लाख इराणी रियाल एवढी आहे.
अर्थतज्ज्ञांच्या मते गेल्या काही वर्षांपासून इराणच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव आहे. 2018 पर्यंतच इराणच्या चलनामध्ये 90 टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे इराणवर अमेरिकेनं लावलेले प्रतिबंध हे आहे, या प्रतिबंधामुळे इराणची निर्यात प्रचंड प्रमाणात घटली आहे, त्यामुळे इराणच्या चलनाची किंमत प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे.
