AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राण गमावलेल्या 2 कोरोना योद्धांच्या कुटुंबियांना केजरीवाल सरकारकडून प्रत्येकी 1 कोटीची मदत

अरविंद केजरीवाल यांनी कोरोना संकटाच्या काळात आपले प्राण गमावलेल्या दोन कोरोना योद्धांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे.

प्राण गमावलेल्या 2 कोरोना योद्धांच्या कुटुंबियांना केजरीवाल सरकारकडून प्रत्येकी 1 कोटीची मदत
| Updated on: Feb 18, 2021 | 10:43 PM
Share

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना संकटाच्या काळात आपले प्राण गमावलेल्या दोन कोरोना योद्धांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. यात कोरोना योद्धा राज कुमार आणि ओमपाल सिंह यांचा समावेश आहे. यातील एक कोरोना योद्धा हा रुग्णालयात सुरक्षारक्षक होता तर एक जण शाळेचे मुख्याध्यापक होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.(Kejriwal govt helps Rs 1 crore each to families of Corona warriors who lost their lives)

“आमच्या कोरोना योद्धांनी जिवावर उदार होत लोकांची सेवा केली आहे. सुरक्षारक्षक राज कुमार आणि शाळेचे मुख्याध्यापक ओमपाल यांचं कोरोना संसर्गामुळे निधन झालं होतं. आज दोघांच्याही कुटुंबियांची भेट घेतली. त्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा धनादेश सोपवला. भविष्यातही या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहू”, असं ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज कुमार हे राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ताहिरपूर इथं सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. तर ओमपाल सिंह हे कल्याणपुरी इथे बॉईज सिनियर सेकंडरी शाळेत मुख्याध्यापक होते.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताला पाहायला मिळत आहे. विदर्भासह मुंबई आणि मराठवाड्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्बंध लावायला आता सुरुवात झाली आहे. मुंबईत नव्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये इमारतींना सील करण्यापासून अनेक गाईडलाईन्स जारी करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता आकडा पाहता या गाईडलाईन्स महत्त्वाच्या आहेत.

मुंबईत कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स नेमक्या काय?

  1. कुठल्याही निवासी इमारतीत कोरोनाचे पाच पेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करण्यात येईल (BMC new guidelines on corona).
  2. विलगीकरणाचे नियम, तसेच लग्न आणि सार्वजनिक कार्यक्रमात नियम न पाळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.
  3. ब्राझील येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसांकरिता संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात येईल.
  4. घरी विलगीकरणात राहणाऱ्या व्यक्तींच्या हातावर शिक्का लावण्यात येईल.
  5. मास्क न लावता प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याकरिता 300 मार्शलची नेमणूक करण्यात येणार आहे.
  6. मास्कचा योग्यरित्या वापर न करणाऱ्या आणि रस्त्यांवर थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याकरिता मार्शल्सची संख्या दुपचीने वाढवून 48 हजार एवढी करण्यात येणार आहे.
  7. विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आणि दंड आकारण्याचेल अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत.
  8. लग्न सोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी केली जाईल. कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले असल्यास दंडात्मक कारवाई करुन आयोजक आणि संबंधित व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल केले जातील.

संबंधित बातम्या : 

मुंबईत लग्‍न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये ‘हे’ नियम पाळणं बंधनकारक, अन्यथा गुन्‍हा दाखल होणार

कोरोनाचा धोका वाढला! तुळजाभवानी दर्शन पासची संख्या निम्म्यावर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Kejriwal govt helps Rs 1 crore each to families of Corona warriors who lost their lives

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.