Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kumbh Mela Fire : कुंभमेळ्यातील स्फोटाची जबाबदारी ‘या’ दहशतवादी संघटनेने स्वीकारली

Kumbh Mela Fire : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात रविवारी आग लागलेली. त्यात काही तंबू जळून खाक झाले. आगीने काही वेळातच विक्राळ रुप धारण केलेलं. आता एका दहशतवादी संघटनेने हा स्फोट असल्याचा दावा केला असून त्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Kumbh Mela Fire : कुंभमेळ्यातील स्फोटाची जबाबदारी 'या' दहशतवादी संघटनेने स्वीकारली
Kumbh Mela Fire
Follow us
| Updated on: Jan 22, 2025 | 9:21 AM

प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. दररोज लाखो लोक अमृत स्नानासाठी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. रविवारी महाकुंभ मेळ्या दरम्यान सेक्टर 19-20 मध्ये आग लागली होती. विवेकानंद सेवा समिति वाराणसीच्या टेंटमध्ये जेवण बनवताना ही आग लागली. आग कशी लागली, त्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ही आग वेगाने पसरली. त्यामुळे आसपासचे तंबू यामध्ये जळून खाक झाले. या टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचे ब्लास्ट झाले. जवळपास 20 ते 25 तंबू या आगीत जळाले.

सिलेंडर स्फोटामुळे आग भडकली होती. आता या सिलेंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. खलिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेने याबाबत काही माध्यम संस्थांना ई-मेल पाठवला आहे, ज्यामध्ये हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. हा स्फोट म्हणजे सीएम योगींना दिलेला इशाराच आहे. ही सुरुवात आहे, असं म्हटलं आहे.

एकच घबराट, गोंधळाची स्थिती

अग्निशमन दलाच्या सहा गाड्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या. पोलीस आणि एनडीआरएफच्या टीम्सनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसपासचे हिस्से रिकामे केले. शास्त्री पुल आणि रेल्वे पुल दरम्यान ही आग लागली होती. हा पूर्ण भाग महाकुंभ क्षेत्रामध्ये येतो. टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडर्सचे एकापाठोपाठ एक ब्लास्ट झाले, त्यामुळे आगीने विक्राळ रुप धारण केलं. सिलेंडर ब्लास्टमुळे आग वेगाने पसरली. आगीच्या या घटनेमुळे संपूर्ण क्षेत्रात एकच घबराट, गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

प्रशासनाने काय सांगितलं नव्हतं?

आगीच्या या घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नाही. जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ही आग पसरली. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने टीव्ही 9 शी संवाद साधला. आगीवर नियंत्रण मिळवल्याचा सांगितलं होतं. अफवांकडे लक्ष देऊ नका असही म्हटलं होतं. ही आग कशी लागली? आणि इतकं विक्राळ रुप कसं धारण केलं? हे प्रशासनाने त्यावेळी स्पष्ट केलं नव्हतं.महाकुंभ क्षेत्रात टेंटमध्ये सुद्धा यात्रेकरुंच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी पैसे भरावे लागतात.

VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार.
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार.
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल.
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?.
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्...
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्....