AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmedabad Plane Crash : लग्नाच्या 5 महिन्यांनी भेटणार होती पतीला, पण…विमान अपघातात खुशबूची स्वप्नं ध्वस्त!

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मनाला हेलावून टाकणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Ahmedabad Plane Crash : लग्नाच्या 5 महिन्यांनी भेटणार होती पतीला, पण...विमान अपघातात खुशबूची स्वप्नं ध्वस्त!
khushboo rajpurohit
| Updated on: Jun 12, 2025 | 9:05 PM
Share

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान एआय-171 चा अपघात झाला आहे. या विमानात एकूण 242 प्रवासी अहमदाबादहून लंडनला जात होते. मात्र या अपघातात फक्त एक प्रवासी वगळता इतर सर्वांचाच मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आता याच विमानात प्रवास करणाऱ्या खुशबू नावाच्या नवविवाहित महिलेची काळीज पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे. लग्नानंतर पाच महिन्यांनी ती तिच्या पतीला भेटायला जात होती. मात्र मध्येच विमान अपघाताच्या रुपात तिच्यावर काळाने घाला घातला.

लंडनला असलेल्या पतीकडे जात होती

मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबादमधील विमान अपघातात खुशबू राजपुरोहित या नवविवाहित तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही तरुणी मूळची राजस्थानमधील बालोतरा जिल्ग्यातील अराबा दुदावता या गावातील रहिवासी होती. लंडनला जाऊन ही तरुणी आपल्या नव्या जीवनाची सुरुवात करणार होती. मात्र त्याआधीच तिचा या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच ती तिच्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या पतीकडे चालली होती. खूशबू राजपुरोहितचा 18 जानेवारी रोजी विपूल सिंह याच्याशी विवाह झाला होता. तिच्या वडिलांचे नाव मदनसिंह राजपुरोहित असे आहे. तिचा पती म्हणजेच विपूलसिंह हा लंडनमध्ये डॉक्टर म्हणून काम करतो. व्हिसा तसेच अन्य पूर्तता झाल्यानंतर आता ती एअर इंडियाच्या विमानाने लंडनला आपल्या पतीकडे जात होती. मात्र मध्येच विमानाचा अपघात झाला आणि तिची स्वपंही या अपघातात उद्ध्वस्त झाली.

ठरल्यानुसार विमानात बसली पण….

खुशबू सध्या तिच्या सासरी म्हणजेच लुणी येथे राहात होती. ती बुधवारी आपल्या गावाहून अहमदाबादला निघाली होती. गुरुवारच्या एअर इंडियाच्या फ्लाईटने ती लंडनला जाणार होती. ठरल्यानुसार ती एअर इंडियाच्या एआय-171 या विमानात बसलीही होती. मात्र हे विमान टेक ऑफ घेतल्यानंतर लगेच मेघाणी नगर येथे कोसळले. यातच तिचा मृत्यू झाला.

मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न

दरम्यान, एअर इंडियाच्या या अपघातग्रस्त विमानात एकूण 10 क्रू मेंबर्स होते. आता मृतांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांकडे सोपवले जाणार आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.