KMC Election Result 2021: पश्चिम बंगालमध्ये ‘दीदीगिरी’ कायम, कोलकाता महापालिकेत टीएमसीचा दणदणीत विजय; भाजपचा सुपडा साफ

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Dec 21, 2021 | 3:47 PM

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा टीएमसीचं वर्चस्व कायम असल्याचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिलं आहे.

KMC Election Result 2021: पश्चिम बंगालमध्ये 'दीदीगिरी' कायम, कोलकाता महापालिकेत टीएमसीचा दणदणीत विजय; भाजपचा सुपडा साफ
सौजन्य: पीटीआय

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा टीएमसीचं वर्चस्व कायम असल्याचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिलं आहे. कोलकाता महापालिका निवडणुकीत टीएमसीने 144 पैकी 134 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत टीएमसीने भाजपचा सुपडा साफ करत निर्विवाद विजय मिळवला आहे.

कोलकाता महापालिकेसाठी आज 144 जागांची मोजणी झाली. यात टीएमसीच्या खात्यात 134 जागा गेल्या आहेत. तर भाजपच्या खात्यात अवघ्या तीन आणि काँग्रेस, डाव्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन जागा गेल्या आहेत. तर तीन जागांवर अपक्षांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या टीएमसीला 71.95% मते मिळाली आहेत. तर भाजपला फक्त 08.94% मते मिळाली आहेत. काँग्रेसला 04.47% आणि डाव्यांना 11% टक्के मते मिळाली आहेत.

कठोर परिश्रम करा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून कोलकात्यातील मतदारांचे आभार मानले आहेत. निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन. कठोर परिश्रम आणि कृतज्ञतेने जनतेची सेवा करा. आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल कोलकात्यातील नागरिकांचं मनापासून आभार मानते, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

द्वेष आणि हिंसाचार नाकारला

या निकालावर टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. बंगालमध्ये द्वेष आणि हिंसेच्या राजकारणाला थारा नसल्याचं कोलकाताच्या जनतेने दाखवून दिलं आहे. इतका मोठा कौल दिला. आम्हाला आशीर्वाद दिला. त्याबद्दल मी कोलकात्याच्या जनतेचा आभारी आहे, असं ट्विट बॅनर्जी यांनी केलं आहे.

मतदान केंद्राभोवती जमावबंदी लागू

दरम्यान, मतमोजणीसाठी एकूण 16 मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. कोणताही हिंसाचार घडू नये म्हणून मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मतदान केंद्राभोवती पक्ष कार्यकर्त्यांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 19 डिसेंबर रोजी महापालिकेसाठी मतदान झालं होतं. कोलकात्यात 64 टक्के मतदान झालं होतं. त्याची मतमोजणी सुरू असून ममता बॅनर्जी यांनी सर्वात मोठा विजय मिळविला आहे.

एकूण जागा- 144 टीएमसी – 134 भाजप – 3 डावे – 2 काँग्रेस – 2 इतर – 3

संबंधित बातम्या:

दिल्लीत आज ओबीसी परिषद, लालू, शरद यादव येणार; भुजबळ राजधानीत शक्तीप्रदर्शन करणार?

लखीमपूर हिंसेप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, राऊतांचा इशारा; विरोधकांचा संसदेबाहेर लाँगमार्च

मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध; विनायक राऊतांकडून गंभीर आरोप

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI