AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिमंडळातून राजीनामे देणाऱ्या भाजप नेत्याचं काय? कुणाला काय जबाबदारी मिळणार?

रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या भाजप नेत्याचं पुढे काय होणार? त्यांना कोणती जबाबदारी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे.

मंत्रिमंडळातून राजीनामे देणाऱ्या भाजप नेत्याचं काय? कुणाला काय जबाबदारी मिळणार?
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 6:33 AM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला. यात अनेक मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली, तर दुसरीकडे काही मंत्र्यांना आपला राजीनामाही द्यायला लागला. राजीनामा द्यावा लागलेल्यांमध्ये रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या या भाजप नेत्याचं पुढे काय होणार? त्यांना कोणती जबाबदारी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. भाजपमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे भाजपचं नेतृत्व यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे (Know what happened with BJP leaders who resign as Minister from Modi Cabinet).

मंत्रिमंडळातील मोठ्या फेरबदलानंतर आता भारतीय जनता पक्षात (BJP) संघटनात्मक पातळीवर मोठे फेरफार होताना दिसत आहेत. पक्षाचे 3 पदाधिकारी आणि एक प्रवक्त्याचा मंत्रिमंडळात समावेश झालाय. त्यानंत लवकरच या जागांवर नेमणूक होऊ शकते. भाजपचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव, राष्ट्रीय उपाध्यक्ष अन्नपूर्णा देवी, राष्ट्रीय सचिव विशेश्वर टुडु आणि राष्ट्रीय प्रवक्ते राजीव चंद्रशेखर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झालाय. त्यानंतर त्यांच्या पदावरील रिक्त जागा भरण्याचे प्रयत्न सुरू झालेत.

आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देताना 7 जुलैला संबंधित नेत्यांनी आपल्या सेवेची गरज पक्षाला आहे आणि पक्षासाठी आपला अनुभव वापरणार असल्याचं मत व्यक्त केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा देणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर आणि डॉ हर्षवर्धन या सारख्या नेत्यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाईल.

काही नेत्यांना राज्यपाल पदाचीही जबाबदारी

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काही वरिष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा उपयोग पुढील 3-4 महिन्यात होणाऱ्या राज्यपाल नियुक्तीतही केला जाणार आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये जवळपास 6 राज्यपाल निवृत्त होत आहेत. या ठिकाणी नव्या राज्यपालांची नियुक्ती होईल. यात या वरिष्ठ नेत्यांचा समावेश असेल.

भाजपच्या संसदीय बोर्डात 5 पदं रिक्त

भाजपच्या संसदीय बोर्डात मागील मोठ्या काळापासून 4 पदं रिक्त होते. सुषमा स्वराज, अनंत कुमार ,अरुण जेटली यांच्या निधनामुळे 3 पदं रिक्त होती. याशिवाय व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्यानं त्यांची एक जागा आणि आता थावरचंद गेहलोत यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानं त्यांची एक जागा अशा एकूण 5 जागा रिक्त आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपच्या संसदीय बोर्डाच्या या 5 जागा देखील भरल्या जातील.

हेही वाचा :

‘कामगिरीच्या आधारावर खरं तर पंतप्रधानांनी पायउतार व्हावं’, मंत्रिमंडळ विस्तारावरुन काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना टोला

मोदींकडे पाहून जनतेने भाजप खासदारांना निवडलं, त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं हा त्यांचा निर्णय : अजित पवार

VIDEO: कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत?, उगाच बदनामी करू नका; देवेंद्र फडणवीस भडकले

व्हिडीओ पाहा :

Know what happened with BJP leaders who resign as Minister from Modi Cabinet

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.