लडाखमध्ये भूस्खलन; लष्कराची तीन वाहनं ढिगाऱ्याखाली; 6 जवान शहीद

भारतीय लष्कराची वाहनं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात लष्कराचे 6 जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

लडाखमध्ये भूस्खलन; लष्कराची तीन वाहनं ढिगाऱ्याखाली; 6 जवान शहीद
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 3:21 PM

नवी दिल्लीः लडाखमध्ये भूस्खलन (Landslide in Ladakh) झाल्यामुळे भारतीय लष्कराची वाहनं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात लष्कराचे 6 जवान शहीद (6 jawans martyred) झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे भूस्खलन इतके धोकादायक होते की लष्कराच्या ताफ्यातील 3 वाहनांना त्याचा मोठा फटका बसला आहे. या बाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती समोर आली नाही. गेल्या काही तासांपासून या भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात, त्याचा फटका भारतीय लष्काराला (Indain Army) बसला आहे.

याआधी ऑगस्टमध्येही उत्तराखंड येथील उत्तरकाशीमधील भैरव घाटी आणि नेलंग दरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे एक जवान शहीद झाला होता.

तर त्याच गस्ती पथकातील एक डॉक्टरही गंभीर जखमी झाला होता. आज घडलेल्या दुर्घटनेतील इतर काही जवानांना वाचवण्यात यश आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये आणखी तीन जणांचे मृतदेह सापडल्याने हिमस्खलनात मृतांची संख्या 19 वर पोहोचली असल्याची माहिती प्रशासनान दिली आहे. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग (एनआयएम) कडून ही ही माहिती देण्यात आली आहे.

हिमस्खलन झालेल्या ठिकाणाहून गुरुवारी संध्याकाळी आणखी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 19 मृतदेह बाहेर काढले आहेत.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापैकी 17 मृतदेह प्रशिक्षणार्थींचे आहेत, तर दोन मृतदेह हे प्रशिक्षकांचे आहेत. त्याचवेळी 10 प्रशिक्षणार्थी अद्याप बेपत्ता झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

लष्कर, हवाई दल, एनआयएम, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस, हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि जिल्हा प्रशासनाकडून शोद मोहीम सुरु करण्यात आली आहे.

मंगळवारी हिमस्खलन झाल्यानंतर काही तासांनी ही शोध मोहीम सुरु करण्यात आली असून आणखी काही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.