AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक; एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये हलवणार

सुप्रीम लालू प्रसाद यादव यांच्यावर पाटणा स्थित पारस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागील तीन दिवसांपासून ते ICU मध्ये भरती आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांना लवकरच हवाई रुग्णवाहिकेने दिल्ली स्थित एम्स रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याचे समजते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आसिफ रहमान यांनी दिली.

Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक; एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये हलवणार
| Updated on: Jul 06, 2022 | 4:42 PM
Share

नवी दिल्ली : नवी दिल्ली: राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची तब्येत आणखी खालावली आहे. पाटणा येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, पुढील उपचारांसाठी त्यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीच्या ‘एम्स’(AIIMS) मध्ये हलवणार असल्याचे समजते.

सुप्रीम लालू प्रसाद यादव यांच्यावर पाटणा स्थित पारस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागील तीन दिवसांपासून ते ICU मध्ये भरती आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांना लवकरच हवाई रुग्णवाहिकेने दिल्ली स्थित एम्स रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याचे समजते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आसिफ रहमान यांनी दिली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालूंची मुले तेजस्वी-तेज प्रताप पारस हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालूच्या तब्येतेची विचारपूस केली. लालूजींची प्रकृती आता स्थिर असून मी सतत्याने त्यांच्या तब्येतीची चौकशी करत होतो. लवकरच त्यांना सरकारी सुविधांसह दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. हा त्यांचा हक्क असल्याचे नितीश कुमार म्हणाले.

पारस हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर तेजस्वी यादव यांनी लालू यादव यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. ‘आज संध्याकाळी ७ च्या सुमारास लालू यादव यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीला नेले जाईल. त्याचबरोबर गरज पडल्यास आम्ही त्यांना सिंगापूरला घेऊन जाऊ असे तेजस्वी यादव म्हणाले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांचा हा परिणाम असल्याचे म्हणत तेजस्वी यांनी सर्वांचे आभार मानले.

तत्पूर्वी बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी रुग्णालयात जाऊन लालूंचे कुटुंबीय आणि डॉक्टरांशी चर्चा केली होती. लालूंना चांगल्या उपचारासाठी दिल्लीला पाठवून एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्या संदर्भातही त्यांनी चर्चा केली आहे.

लालूप्रसाद यादव यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदय रोग, किडनी रोग, किडनी स्टोन, टेन्शन यासारख्या अनेक आजारांनी ग्रासलेय

लालूप्रसाद यादव यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदय रोग, किडनी रोग, किडनी स्टोन, टेन्शन, थैलेसीमिया, प्रोस्टेट वाढणे, यूरिक अॅसिड वाढणं, मेंदू संबंधित विकार, कमकुवत इम्युनिटी, उजव्या खांद्याच्या हाडाचा प्रॉब्लेम, पायाच्या हाडाचा प्रॉब्लेम आदी आजार आहेत.

घोटाळ्या प्रकरणी लालूंना पाच वर्षाची शिक्षा, 60 लाखांचा दंड

लालूप्रसाद यादव यांच्यावर बहुचर्चित डोरंडा कोषागारमधून 139.35 कोटी रुपये हडपल्याचा आरोप असून या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच 60 लाखांपर्यंतचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे त्यांची होटवार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.