वैष्णोदेवी मार्गावर दरड कोसळली, 5 भाविकांचा मृत्यू, 14 जखमी, रेस्क्यू ऑपरेशन सुरु
जम्मू -काश्मीरातील रियासी जिल्ह्यातील त्रिकुट पर्वतावर माता वैष्णो देवी मंदिरात जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी लँडस्लाईडची घटना घडली आहे. त्यामुळे पाच भाविकांचा मृत्यू झाला असून अजूनही काही जण अडकले असण्याची शक्यता असून मदतकार्य सुरु आहे.

जम्मू-कश्मीरातील त्रिकूट पर्वतावर स्थित माता वैष्णो देवी मंदिराला जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी भूस्खलन होऊन दरड कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे. अर्धकुवांरी स्थित इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ ही दरड कोसळल्याने यात पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 14 भाविक जखमी झाले आहेत. घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. ढीगाऱ्याच्या खाली आणखी काही भाविक अडकलेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरातील अनेक भागात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ही त्रिकूट पर्वतात ही दरड कोसळण्याची घटना घडली आहे.
जम्मूच्या संभागमध्ये जोरदार पावसाने आतापर्यंत आठ जणांचे मृत्यू झाले आहेत. यात पाच भाविकांचा समावेश असून ते माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला आले होते.येथे 24हून अधिक घरे आणि पुल क्षतिग्रस्त झाले होते.जम्मूमध्ये सर्व जलाशय धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त वाहत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की जम्मू संभाग येथील काही ठिकाणची परिस्थिती बिकट झालेली आहे. आपण स्वत: स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी श्रीनगरातून येणाऱ्या विमानाने जम्मूला जाणार आहेत असे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
हायवेवरील ट्रॅफीक बंद, यात्रा स्थगित
जम्मू-श्रीनगर आणि किश्तवाड-डोडा राष्ट्रीय महामार्गावरील दळणवळण थांबवण्यात आले आहे. तर काही पर्वतातील मार्ग दरडी कोसळल्याने किंवा पुरामुळे मार्ग बंद झाले आहेत. पावसामुळे सुरक्षेचे पाऊल म्हणून वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. विविध घटनात गंदोहमध्ये दोन आणि ठाठरीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.जेव्हा 15 घरे आणि चार पुल क्षतिग्रस्त झाला आहे. आता अर्द्धकुंवारी येथे पाच लोकांचा मृ्त्यू झाल्याचे उघड झाले आहे.
