Fact Check: चक्रीवादळानंतर गीरच्या अभयारण्यातील सिंहांच्या कळपाचा ‘तो’ व्हीडिओ, जाणून घ्या सत्य

गुजरातच्या अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. अशात गीर अभयारण्यातील सिंहांचा हा स्वच्छंद विहार अनेकांसाठी सुखावणारा होता. | lions of gir after Cyclone Tauktae

Fact Check: चक्रीवादळानंतर गीरच्या अभयारण्यातील सिंहांच्या कळपाचा 'तो' व्हीडिओ, जाणून घ्या सत्य

अहमदाबाद: तौक्ते चक्रीवादळानंतर सोशल मीडियावर गुजरातच्या गीर अभयारण्यातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हीडिओत गीरच्या अभायरण्यात आशियाई प्रजातीच्या सिंहांचा एक कळप पाण्यातून वाढ काढताना दिसत आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) गुजरातच्या अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. अशात गीर अभयारण्यातील सिंहांचा हा स्वच्छंद विहार अनेकांसाठी सुखावणारा होता. त्यामुळे हा व्हीडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (Viral video claming to show lions of gir after Cyclone Tauktae know the truth behind this viral video)

विशेष म्हणजे हा व्हीडिओ गुजरातच्या वन आणि पर्यावरण खात्याचे अतिरिक्त सचिव डॉ. राजीव कुमार गुप्ता यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये त्यांनी गीर अभयारण्य पूर्पणे सुरक्षित असल्याचे म्हटले होते. मात्र, शनिवारी त्यांनी हा व्हीडिओ ट्विटवरून डिलिट केला. हा व्हीडिओ दक्षिण आफ्रिकेच्या माला माला गेम रिझर्व्हमधील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. फेब्रुवारी महिन्यात हा व्हीडिओ चित्रीत करण्यात आला होता.

अतिरिक्त सचिवांवर माफी मागण्याची वेळ

वन आणि पर्यावरण खात्याचे अतिरिक्त सचिव डॉ. राजीव कुमार गुप्ता यांनी हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो लाखो लोकांनी पाहिला होता. मात्र, ही क्लीप आपल्याला एका प्रख्यात वन्यप्रेमी व्यक्तीने पाठवली होती. त्यामध्ये जंगलाचा परिसर हा गीर अभयारण्याप्रमाणेच दिसत होता. त्यामुळे मी हा व्हीडिओ शेअर केला. मात्र, हा व्हीडिओ खोटा असल्याचे लक्षात आल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे डॉ. राजीव कुमार गुप्त यांनी सांगितले.

इतर बातम्या:

मी आधीच सांगितलं होतं, निवडणुका संपल्यावर मोदी चॅनेलवर येऊन रडतील; आप खासदाराचं ट्विट व्हायरल

Photo : तौक्ते वादळाचं रौद्ररुप, गोव्यात दाणादाण तर गुजरातमध्ये एनडीआरएफ सज्ज

Monsoon Rain : मान्सून अंदमानात दाखल, हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला!

(Viral video claming to show lions of gir after Cyclone Tauktae know the truth behind this viral video)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI