कन्नडिगांचा थयथयाट सुरूच, मध्यवर्ती म.ए. समितीच्या नेत्यांना केली अटक…

बेळगावमध्ये 144 कलम लागू असताना अशाप्रकारे निवेदन देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने जमणे चुकीचे असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कन्नडिगांचा थयथयाट सुरूच, मध्यवर्ती म.ए. समितीच्या नेत्यांना केली अटक...
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 5:43 PM

बेळगावः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा दोन्ही राज्यात प्रचंड तापला आहे. त्यामुळे आता दोन्ही राज्यातून जोरदार आंदोलनं करण्यात येत आहे. तर दुसरीकडे कर्नाटकात असणाऱ्या मराठी भाषिकांवर आता कर्नाटक सरकारकडून अन्याय अत्याचार करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद वाढल्यानंतर त्याच्यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई कर्नाटकात जाणार होते. मात्र मंत्र्यावर कर्नाटकात प्रवेशबंदी घालण्यात आली. त्यानंतर बेळगावमध्ये 144 कलम लागू करून जमावबंदीचे आदेश देण्यात आले.

बेळगाव आणि सीमाभागात 144 कलम लागू करण्यात आल्यानंतर मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांची अडवणूक करू नका. या मागणीचे निवेदन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासा्ठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बेळगावमध्ये 144 कलम लागू असताना अशाप्रकारे निवेदन देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने जमणे चुकीचे असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

यामध्ये मध्यवर्ती म. ए. समितीचे प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, मनोहर किणेकर, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, शिवाजी सुंठकर, आर. एम. चौगुले, सरस्वती पाटील, आर. आय. पाटील, भागोजी पाटील, शिवाजी मंडोळकर, मनोज पावशे, प्रवीण रेडेकर, ऍडव्होकेट एम जे पाटील, मोतेश बार्देशकर, अमर यळ्ळूरकर, सुधीर चव्हाण, चंद्रकांत कोंडुस्कर यांचा समावेश आहे.

मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आल्याने सीमाभागात आता हे वातावरण तापले आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारवर घटनाबाह्य वागत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.