AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक नवरा अघोरी साधूच्या रुपात भेटला, डीएनए टेस्टची मागणी, 27 वर्षांपूर्वी काय घडलं?

कुंभमेळ्यात लोक हरवल्याची, दूर झाल्याची अनेक प्रकरणं आपण ऐकली असतील. 'अरे कुंभ के मेले में बिछड़ गए थे क्या'.. असं काहीजण मजेतही म्हणतात. चित्रपटांतही अशा काही कहाण्या दाखवल्या जातात. पण सध्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेला कुंभमेळा हा एका कुटुंबासाठी वरदान ठरला आहे.

अचानक नवरा अघोरी साधूच्या रुपात भेटला, डीएनए टेस्टची मागणी, 27 वर्षांपूर्वी काय घडलं?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jan 30, 2025 | 11:33 AM
Share

कुंभमेळ्यात लोक हरवल्याची, दूर झाल्याची अनेक प्रकरणं आपण ऐकली असतील. ‘अरे कुंभ के मेले में बिछड़ गए थे क्या’.. असं काहीजण मजेतही म्हणतात. चित्रपटांतही अशा काही कहाण्या दाखवल्या जातात. पण सध्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेला कुंभमेळा हा एका कुटुंबासाठी वरदानासारखा ठरल्याचे दिसत आहे. एका कुटुंबाला त्यांची हरवलेली व्यक्ती याच कुंभमेळ्यात सापडल्याचे समोर आले आहे. खरंतर हे प्रकरण आहे झारखंडच्या एका कुटुंबाचं. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात 27 वर्षांनंतर आपला हरवलेला सदस्य सापडल्याचा दावा या कुटुंबाने केला आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, जाणून घेऊया.

1998 साली झाले बेपत्ता

त्या कुटुंबियांच्या सांगण्यानुसार, 1998 मध्ये बेपत्ता झालेले गंगासागर यादव आता ‘अघोरी’ साधू बनले आहेत, ज्यांना लोक बाबा राजकुमार म्हणून ओळखतात. त्या व्यक्तीचे वय आता 65 वर्ष आहे. 1998 मध्ये पाटण्याला गेल्यानंतर गंगासागर अचानक बेपत्ता झाले आणि त्यांच्याबद्दल कोणतीची बातमी मिळाली नाही. त्यानंतर त्यांची पत्नी धनवा देवी यांनी एकटीनेच, त्यांच्या दोन मुलांचा कमलेश आणि विमलेश यांचा सांभाळ केला. मात्र आता तेच गंगासागर यादव हे कुंभमेळ्यात सापडले असून ते अघोरी बाबा म्हणून ओळखले जातात, अशी माहिती समोर आली आहे. राजकुमार असे नाव धारण करून ते एका खास साधू समाजाशी जोडले गेले आहेत.

कुटुंबाचा दावा काय ?

गंगासागर यांचे धाकटे भाऊ मुरली यादव म्हणाले, ‘आमचा भाऊ पुन्हा कधी सापडेल याची आम्ही आशाच सोडली होती, पण अलीकडेच आमच्या एका नातेवाईकाने कुंभमेळ्यात एका साधु पाहिला जो गंगासागर यांच्यासारखा दिसत होता. त्याने त्याचा फोटो काढला आणि तो आम्हाला पाठवला. तो फोटो पाहून आम्ही लगेचच कुंभमेळ्यात पोहोचलो आणि बाबा राजकुमार यांची भेट घेतली. मात्र त्यांनी त्यांची जुनी ओळख सपशेल नाकारली आणि आपण वाराणसीचे साधू आहोत, असा दावा केला. मी वाराणसीचा साधू आहे, गंगासागर यांच्याशी माझा काहीच संबंध नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका साध्वीनेही या गोष्टीचे समर्थन केले .

खूण पाहून कुटुंबाला खात्रीच पटली

मात्र कुटुंबिय हे त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहेत. त्यांनी गंगासागर यांच्या शरीरावरील काही खुणांची ओळख पटवली आणि तेच गंगासागर आहेत, असा दावा केला. त्यांचे लाब दात, डोक्यावरच्या जखमेची खूण आणि गुडघ्यावरील जुनी जखम , या सर्व खुणा पाहता हे साधू म्हणजे गायब झालेले गंगासागर हेच आहे, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. गंगासागर यांची पत्नी धनवा देवी आणि भाऊ मुरली यादव यांनी कुंभमेळा पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली असून त्यांनी बाबा राजकुमार यांच्या डीएनए चाचणीची मागणी केली आहे. कुंभमेळा संपेपर्यंत आम्ही वाट पाहू आणि गरज पडल्यास डीएनए चाचणी करून घेऊ असे मुरली यादव म्हणाले. ती टेस्ट केल्यानंतरही आमचं म्हणणं खरं ठरलं नाही तर आम्ही बाबा राजकुमार यांची माफी मागू असंही त्यांनी नमूद केलं.

सध्या त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती घरी परत गेल्या आहेत. मात्र काही जण अजूनही कुंभमेळ्यातच थांबले असून ते बाबा राजकुमार यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. 27 वर्षांपूर्वी गंगासागर हे बेपत्ता झाल्यानंतर त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्यांचा मोठा मुलगा त्यावेळी फक्त दोन वर्षांचा होता. हे बाबा म्हणजे खरेच गंगासागर आहेत की तो कुटुंबियांचा गैरसमज आहे, हे सत्य आता डीएनए चाचणीतून सत्य समोर येईल.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.