Maharashtra News LIVE : अमरावतीत विद्यार्थ्यांनी चक्क शाळेला कुलूप लावून पालकासह ठिय्या आंदोलन केले

Maharashtra News LIVE : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीने रणशिंग फुंकलेले आहे. काल काँग्रेसने शांततापूर्ण आंदोलन केले. आज विरोधी गोटातील खासदार राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra News LIVE : अमरावतीत विद्यार्थ्यांनी चक्क शाळेला कुलूप लावून पालकासह ठिय्या आंदोलन केले
आजच्या ठळक बातम्या, टीव्ही ९ मराठी ब्लॉग
| Edited By: | Updated on: Oct 09, 2026 | 6:47 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 09 Oct 2026 06:47 PM (IST)

    राज्यसभेच्या १२ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे

    राज्यसभेच्या १२ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे.  उत्तर प्रदेशात भाजपने राज्यसभेच्या आठ जागा जिंकल्या आहेत.  तर समाजवादी पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत.  उत्तराखंडमधून भाजपचे दिनेश कुमार बिनविरोध निवडून आले आहेत. तर पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत रुक्मिणी मल्लिक बिनविरोध निवडणूक आल्या आहेत.

  • 09 Oct 2026 06:30 PM (IST)

    अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेतील बंडखोरी कायम..

    अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातील बंडखोरी शमवण्यात पक्षश्रेष्ठींना अखेर अपयश आले आहे. शिवसेनेचे किरण सरनाईक आणि श्रीकांत देशपांडेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


  • 09 Oct 2026 06:18 PM (IST)

    अमरावतीत विद्यार्थ्यांनी चक्क शाळेला कुलूप लावून पालकासह ठिय्या आंदोलन केले

    अमरावती जिल्ह्यातील वायगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते सात पर्यंतच्या वर्गाकरिता केवळ दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. वायगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांचा दुष्काळ आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण न होत असल्याने विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी चक्क शाळेला कुलूप लावून शाळेच्या बाहेर पालकासह ठिय्या आंदोलन केले सुरू केले आहे.

  • 09 Oct 2026 05:00 PM (IST)

    जळगावच्या जामनेर तालुक्यातील शहापूर येथील विद्यार्थ्यांची पंचायत समिती आवारात भरली शाळा…

    जळगावच्या जामनेर तालुक्यातील शहापूर येथील विद्यार्थ्यांची पंचायत समिती आवारात शाळा भरली . शहापूर येथील उर्दू शाळेचे बांधकाम रखडल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी अनोखं आंदोलन केलं.  विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि ग्रामस्थांनी थेट पंचायत समितीत शाळा भरवली . मंजुरी मिळूनही नवीन इमारतीचे काम रखडल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं.

  • 09 Oct 2026 04:55 PM (IST)

    MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेण्याचा अधिकार सरकारला नाही – देवेंद्र फडणवीस

    MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेण्याचा अधिकार सरकारला नाही, अध्यक्षांच्या राजीनाम्याचे अधिकार राज्यपालांना आहेत. पेपरफुटीवेळी भीमनवार हे MPSCचे अध्यक्ष झाले नव्हते – देवेंद्र फडणवीस


  • 09 Oct 2026 04:43 PM (IST)

    अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम.

    अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम, एकाही उमेदवाराची माघार नाही. ठाकरेंच्या शिवसेने कडून दत्तात्रय लहाने निवडणूकीच्या रिंगणात आहेत.  प्रचाराच्या पत्रकावर लहाने यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरील जाहीरनामा छापला . जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होणार नाही तोपर्यंत आमदारकीचे मानधन घेणार नाही, असा निर्धार लहाने यांनी व्यक्त केला.

  • 09 Oct 2026 04:31 PM (IST)

    भाजप नेते गिरीष व्यास यांचा भाजपचे प्राथमिक सदस्यत्व आणि सर्व पदांचा राजीनामा

    भाजप नेते गिरीष व्यास यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.  भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांना पाठिंबा जाहीर केला . प्रा. अनिल सोले यांचं मुख्य प्रचार कार्यालय सुद्धा , गिरीश व्यास यांच्या महाल परिसरातील कार्यालयात सुरू करण्यात येत आहे

  • 09 Oct 2026 04:15 PM (IST)

    डोंबिवलीत ड्रग्जचा विळखा ! दोन मुलं व्यसनाधीन, वडिलांची पोलिसांकडे धाव

    डोंबिवलीत ड्रग्जचा विळखा ! दोन मुलं व्यसनाधीन, वडिलांची पोलिसांकडे धाव!  दत्तनगर परिसरात खुलेआम ड्रग्ज विक्री होत असल्याचा आरोप आहे. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे अल्पवयीन मुलगा १८ तास बेशुद्ध होता  दोन मुलं व्यसनाधीन झाल्याने वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. इतर मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये; असं म्हणत ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली.

  • 09 Oct 2026 04:07 PM (IST)

    रेल्वे रद्द करण्याच्या निर्णयावरून अभिजीत दीपके यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका

    रेल्वे रद्द करण्याच्या निर्णयावरून अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांकानी यांनी व्हिडीओ बनवत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.  रेल्वे बंदच्या निर्णयावरून सरकारची खिल्लीदेखील उडवण्यात आली.

     

  • 09 Oct 2026 04:03 PM (IST)

    करमाळयात दुष्काळी केंद्रीय पाहणी पथक दाखल

    करमाळयात पथक शासकीय विश्रामगृह येथे दुष्काळी केंद्रीय पाहणी पथक दाखल झालं आहे.  करमाळयातील कुठल्याही भागात केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक पाहणी न करता सोलापूरकडे रवाना झालं.  काल तालुक्यातील करंजे येथील शेतकऱ्याने दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केली होती.

  • 09 Oct 2026 02:55 PM (IST)

    नाशिकमध्ये प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतराचा प्रयत्न

    नाशिकमध्ये प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतराचा प्रयत्न. फोटो, व्हिडिओ व्हायरल करत धर्मांतर करण्याचा प्रयत्न. नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल. तरुणाच्या त्रासामुळे पीडित कुटुंबीयांनी आपली राहण्याची जागा बदलली… तरी देखील अल्पवयीन मुलीशी संपर्क साधून लग्नासाठी दबाव टाकत होता

  • 09 Oct 2026 02:45 PM (IST)

    शिवसेना नेते गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतण्याची शक्यता- सूत्र

    मोठी बातमी,  शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतण्याची शक्यता- सूत्र.

  • 09 Oct 2026 02:37 PM (IST)

    मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून एम के देशमुखांचा अर्ज मागे

    मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून एम के देशमुखांचा अर्ज मागे. मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाणांच्या सांगण्यावरुन अर्ज मागे. महायुतीकडून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात. मविआकडून मात्र मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता. ठाकरे सेनेचे दिलीप घुगे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज कायम

  • 09 Oct 2026 02:28 PM (IST)

    दिल्लीत निमलष्करी दलाच्या 50 अतिरिक्त तुकड्या दाखल

    दिल्लीत निमलष्करी दलाच्या 50 अतिरिक्त तुकड्या दाखल. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. RAF जवान दिल्ली पोलिसांच्या समन्वयाने काम करणार.

  • 09 Oct 2026 02:17 PM (IST)

    पुणे पदवीधरमधून NCPच्या भैया मानेंकडून उमेदवारी अर्ज मागे

    पुणे पदवीधरमधून NCPच्या भैया मानेंकडून उमेदवारी अर्ज मागे. राष्ट्रवादीतील बंडखोर उमेदवार भैया मानेंनी अर्ज मागे घेतला. आता फडणवीस आणि सुनेत्रा पवारांची भेट घेईन. मनात खंत पण नाराज नाही, महायुतीला मदत करणार- भैया माने

  • 09 Oct 2026 02:10 PM (IST)

    पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटेंनी अर्ज मागे घेतला

    पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटेंनी अर्ज मागे घेतला. शिंदेंच्या आदेशानंतर मंगेश चिवटेंकडून उमेदवारी अर्ज मागे. चिवटे विधानसभेतील जातील, शिंदेंचा शब्द- रवींद्र धंगेकर. पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून कौस्तुभ गावडे लढणार

  • 09 Oct 2026 12:50 PM (IST)

    दिल्लीती उद्या होणाऱ्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

    दिल्लीती उद्या होणाऱ्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. उद्या नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकात पोहोचणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आज (९ ऑक्टोबर) रोजी दुपारी २ नंतर त्यांच्या मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि उद्या (१० ऑक्टोबर) पहाटे ४:०० ते दुपारी २:०० या वेळेत नवी दिल्ली किंवा हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल/एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी यानुसार प्रवासाच नियोजन करावे अशी रेल्वे प्रशासनाने विनंती केली.

  • 09 Oct 2026 12:40 PM (IST)

    वर्धा जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या तापमानाचा फटका

    वर्धा जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, संत्र्याच्या आंबिया बहरातील फळांची मोठ्या प्रमाणात गळ होत आहे. परिपक्व होत असलेली संत्र्याची फळे झाडावरून गळून पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आष्टी तालुक्यातील शेतकरी एकनाथ खोरगडे यांच्या संत्रा बागेतही फळगळ सुरू असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. वाढत्या तापमानामुळे आधीच पिकावर संकट निर्माण झाले असताना, शेतातील विहिरीचे पाणी अपुरे पडत असल्याने संत्रा बागांना पुरेसे सिंचन करणेही शक्य होत नाही.

  • 09 Oct 2026 12:30 PM (IST)

    चिंचोली तलाव पूर्णपणे कोरडा; सांगोला तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर

    सांगोला तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केला आहे. चिंचोली तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने परिसरातील शेतीसह सांगोला शहराच्या पाणीपुरवठ्यावरही संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे नीरा कालव्याद्वारे चिंचोली तलावात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही आमदार बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केले.

  • 09 Oct 2026 12:20 PM (IST)

    नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

    मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. जेष्ठ अभिनेत्री, दूरदर्शन नाट्य क्षेत्रातील प्रशिक्षिका, दिग्दर्शिका, सई परांजपे यांना यंदाचा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमिदिनी पुरस्काराचं वितरण होणार आहे. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार आहे.

  • 09 Oct 2026 12:10 PM (IST)

    नाशिक- भोंदू अशोक खरातला थोड्याच वेळात नाशिक न्यायालयात हजर केलं जाणार

    नाशिक- भोंदू अशोक खरातला थोड्याच वेळात नाशिक न्यायालयात हजर केलं जाणार आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात अशोक खरातला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज पुन्हा न्यायालयात हजेरी लागणार आहे. अशोक खरातला पुन्हा पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी, याकडे लक्ष लागून आहे.

  • 09 Oct 2026 11:58 AM (IST)

    जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील नानेगाव मध्ये केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक दाखल

    जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील नानेगाव मध्ये केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक दाखल झालं आहे. जालन्याच्या जिल्हाधिकारी अशिमा मित्तल,जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्यासह कर्मचारी उपस्थित आहेत. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून नानेगाव मधील शेतकऱ्यांच्या बांधावर जात सोयाबीन आणि कपाशी पिकाची  पाहणी केली जात आहे. नानेगाव मधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले असून केंद्रीय पथकासमोर आपल्या झालेल्या नुकसानीच्या व्यथा मांडत आहे. जालना जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था मोठी बिकट झाली आहे..

  • 09 Oct 2026 11:50 AM (IST)

    पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पग्रस्तांना तब्बल ५६ वर्षानंतर आज न्याय मिळणार

    शासनाच्या सेवा संकल्प अभियाना अंतर्गत राज्याचे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पालघर तालुक्यातील नेवाळे आणि हनुमान नगर येथील पात्र खातेदारांना प्रत्यक्ष वहीवाटीनुसार नवीन ७/१२ उतारे आणि अन्य सेवांचे वाटप होणार आहे. या सभेची पूर्ण तयारी झाली आहे. तत्कालीन ठाणे जिल्ह्यात १९७० ते १९८२ दरम्यान सूर्या धरण प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आले. या प्रकल्पासाठी एकूण ११ गावांचे विस्थापन झाले होते. विस्थापित धरणग्रस्तांचे पालघर तालुक्यातील हनुमान नगर व नेवाळे या ठिकाणी पुनर्वसन करून त्यांना शेती आणि घरांसाठी शासकीय जमीन वाटप करण्यात आली होती. मात्र पुनर्वसन होऊन ५६ वर्षानंतर देखील ४६७ पैकी २०५ शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे, गाव नकाशा, चतुर्सीमा नकाशा आणि धरणासाठी संपादित जमिनींचा योग्य मोबदला मिळालेला नव्हता. ते स्वप्न येथील अधिवाशी बांधवाचे पूर्ण होणार आहे.

  • 09 Oct 2026 11:42 AM (IST)

    लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधींना आंदोलन पुकारलं – विजय वडेट्टीवार

    लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधींना आंदोलन पुकारलं… आंदोलन चिरडण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या गैरवापर झाला. हिंदू – मुस्लिम करून भाजपने अराजकता माजवलीये… असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

     

  • 09 Oct 2026 11:35 AM (IST)

    अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

    अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात येत आहे.  दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक आज जिल्हा दौऱ्यावर आहेत,  पथकाकडून विविध दुष्काळग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करत आहेत, पिण्याचे पाणी, टँकर, शेतीपिकांचे नुकसान आणि चारा उपलब्धतेचा आढावा घेतला जाणार  पाहणीचा सविस्तर अहवाल केंद्र शासनाला सादर केला जाणार.

  • 09 Oct 2026 11:24 AM (IST)

    महाड येथील MIDC तील स्ट्रॉईड लाईफ सायन्स कंपनीमध्ये स्फोट…

    महाड येथील MIDC तील स्ट्रॉईड लाईफ सायन्स कंपनीमध्ये स्फोट झाला आहे. नायट्रोजनची प्रक्रिया सुरु असताना स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 4 कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  • 09 Oct 2026 11:09 AM (IST)

    अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात भया व परिस्थिती असल्याची पथकाचे अध्यक्ष ए. के. मधोक यांची प्रतिक्रिया

    दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक वाशिम जिल्हात दाखल झालं असून सुपखेला येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पथकाला जिल्ह्यातील पीक नुकसानीची माहिती दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीय पथकाचे अध्यक्ष ए. के. मधोक… यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात भयावह परिस्थिती असल्याचं सांगत पीक नुकसानीची पाहणी करून सत्य परिस्थिती केंद्र सरकारला कळवणार असल्याचं सांगितलंय….

  • 09 Oct 2026 10:55 AM (IST)

    दिल्लीत  खासदारांच्या अुनपस्थितीवरुन राऊतांचे परखड उत्तर

    दिल्लीत  खासदारांच्या अुनपस्थितीवरुन राऊतांचे परखड उत्तर. म्हणाले की,” दिल्लीत अचानक ठरलं आणि राज्यात नियोजित दौरे होते.”

  • 09 Oct 2026 10:50 AM (IST)

    आमदार नारायण कुचेंकडून शेतकरी बांधव केंद्रीय पथकाला झालेल्या नुकसानीची माहिती

    आमदार नारायण कुचे यांच्यासह शेतकरी बांधव केंद्रीय पथकाला झालेल्या नुकसानीची माहिती देत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने एक जनावर देखील या ठिकाणी केंद्रीय पथकाच्या समोर शेतकऱ्यांनी आणलेला आहे. त्याचबरोबर शेतातील करपलेल्या सोयाबीन केंद्रीय पथकाला दाखवलं जात आहे

  • 09 Oct 2026 10:45 AM (IST)

    मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते राज्य गॅझेटिअर प्रकाशन सोहळा

    मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते राज्य गॅझेटिअर प्रकाशन सोहळा. सांस्कृतिक कार्य विभागाचा पुढाकार. दर्शिका विभागाचा राज्य गॅझेटिअर प्रकाशन सोहळा पडणार पार. दर्शिका विभागाचा राज्य गॅझेटिअर प्रकाशन सोहळा. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मधील राजर्षी शाहू सभागृह कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात रुतू तावडे,अनिल देसाई महेश सावंत राहणार उपस्थित. आज एकाच व्यासपीठावर भाजप आणि ठाकरे गट येणार

     

  • 09 Oct 2026 10:40 AM (IST)

    प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात आरोपी पप्या शिंदे यांची पोलिस कोठडी संपली

    प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात आरोपी पप्या शिंदे यांची पोलिस कोठडी संपत आहे … ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी पथक ठाणे सत्र न्यायालयामध्ये पोलीस कोठडीची मागणी करणार.. पप्या शिंदे पोलिसांना सहकार्य करत असल्याची माहिती पोलिसांनी ठाणे कोर्टात दिली होती… आज पप्या शिंदे यांना पोलीस कोठडी या न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे….

  • 09 Oct 2026 10:35 AM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात 1 हजार 200 रुपयांची वाढ, चांदीचे दर मात्र स्थिर. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 53 हजार 676 रुपये…चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 31 हजार 750 रुपयांवर स्थिर.

  • 09 Oct 2026 10:30 AM (IST)

    दिल्लीच्या जंतर-मंतरवर उद्या सीजीपीचे आंदोलन

    दिल्लीच्या जंतर-मंतरवर उद्या सीजीपीचे आंदोलन. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी. जंतर-मंतरवरील आंदोलनात मनसे नेते सहभागी होण्याची शक्यता -सूत्र. मनसेकडून देखील सीजीपी च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या जाण्याच्या तयारीत – सूत्र. दिल्लीत सीजीपीच्या आंदोलनाला जाणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

  • 09 Oct 2026 10:25 AM (IST)

    जालन्यात केंद्रीय पथकाच्या दुष्काळ दौऱ्यापूर्वी जालना जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

    जालन्यात केंद्रीय पथकाच्या दुष्काळ दौऱ्यापूर्वी जालना जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया. जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची सगळी माहिती केंद्रीय पथकाला देणार. जालना जिल्ह्यात 65 टक्के पंचनामे पूर्ण,येणाऱ्या आठ दिवसांमध्ये शंभर टक्के पंचनामे पूर्ण करणार. जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची प्रतिक्रिया. जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा

  • 09 Oct 2026 10:20 AM (IST)

    यवतमाळ- घाटंजी तालुक्यात चक्क ८४८ गांजाच्या झाडांची लागवड

    यवतमाळ- घाटंजी तालुक्यात चक्क ८४८ गांजाच्या झाडांची लागवड. जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई. कपाशी-तुरीच्या आड गांजाची शेती; कुंभारी शिवारात ८४८ झाडे जप्त. 47 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

  • 09 Oct 2026 10:15 AM (IST)

    वाशिममध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणाऱ्या पथकाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

    वाशिम जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु. अमरावती विभागातील पाचाही जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला जातोय नुकसानीचा आढावा. खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद,मूग पिकाचं मोठं नुकसान. बैठकीनंतर वाशिम जिल्ह्यातील पचार ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पथक करणार पाहणी.

  • 09 Oct 2026 10:11 AM (IST)

    केंद्रीय पाहणी पथक दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी

    केंद्रीय पाहणी पथक दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी पोहोचले. या  दौऱ्यापूर्वी जालन्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल नानेगाव मध्ये दाखल झाले आहेत.

  • 09 Oct 2026 10:05 AM (IST)

    भाजप बंडखोर शेखर भोयर यांची प्रतिक्रिया

    शेखर भोयर, भाजप बंडखोर म्हणाले, “मी अठरा वर्षापासून तयारी करत आहे त्यामुळे मी निवडणूक लढवणारच..मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही भाजपचे बंडखोर शेखर भोयर यांची भूमिका, विद्यमान आमदार किरण सरनाईची संधी साधू आहे..किरण सरनाईक स्वार्थासाठी शिंदे गटात गेले आहे..किरण सरनाईक अमिष देऊन आमदार झाले..”

  • 09 Oct 2026 10:03 AM (IST)

    शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग अलर्ट, पोलीस स्टेशन मधून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे मॉनिटरिंग

    शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. नवरात्रोत्सवासाठी लाखो भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होणार असल्याने शहरातील आणि शहरालगतच्या महत्त्वाच्या रहदारीच्या ठिकाणी २३३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचं मॉनिटरिंग तुळजापूर येथील पोलीस स्टेशन मधून केले जात आहे. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत गर्दीवर लक्ष ठेवणे, संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.नवरात्रोत्सवाच्या काळात तुळजापुरात येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

  • 09 Oct 2026 09:55 AM (IST)

    वाशिकमध्ये दुष्काळी परिस्थितीचं केंद्रीय पथक आज करणार पाहणी

    वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची केंद्रीय पथक पाहणी करणार आहे.  वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात अमरावती विभागीची केंद्रीय पथकासोबत बैठक सुरू आहे.  विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.  बैठकीनंतर केंद्रीय पथक वाशिम तालुक्यातील सुपखेला इथं पिकांची पाहणी, मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी , मानोरा तालुक्यातील कुपटा व कारंजा तालुक्यातील मिर्झापूर पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.  केंद्रीय पथकाकडून दुष्काळाची तीव्रता आणि पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे.

  • 09 Oct 2026 09:43 AM (IST)

    राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, सूत्रांची माहिती

    दिल्लीतील इंडिया आघाडीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांंधी यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच इतर राष्ट्रीय नेत्यांनाही कॉल केला आहे.

  • 09 Oct 2026 09:40 AM (IST)

    जळगावच्या महापौरांच्या कारवर रसवंती चालकाचा हल्ला

    जळगाव महापालिकेत महापौरांच्या उभ्या गाडीवर लोखंडी रॉड मारून रसवंती चालकाने नुकसान केले.  अतिक्रमण विभागाने रसवंतीची गाडी जप्त केल्याने तरुणाने महापालिकेत गोंधळ घालत महापौरांच्या गाडीवर लोखंडी रॉड मारला. या घटनेमध्ये महापौर दीपमाला काळे यांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणात महापौर दीपमाला काळे यानी आयुक्तांशी चर्चा करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • 09 Oct 2026 09:27 AM (IST)

    काँग्रेसची डबल ढोलकी, ज्ञानेश कुमारांवरील आंदोलनावरून मुख्यमंत्र्याचा टोला

  • 09 Oct 2026 09:16 AM (IST)

    तुम्हाला जनतेच्या हिताचं काम करायचे तर…संतोष पंडित यांनी विचारला पोलिसांना जाब

    पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळ असणाऱ्या एस एम जोशी पुलावर संतोष पंडित जात होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांना जाब विचारलाय. तुम्हाला जनतेच्या हिताचं काम करायचे तर रस्ता का आडून ठेवलाय. आंदोलनकर्ते आंदोलनाचे काम करतील. परंतु तुम्ही रस्ता का आडून ठेवलाय. यावेळी ट्रॅफिकची समस्या निर्माण होत असल्याचा सवाल देखील संतोष पंडित यांनी उपस्थित केलाय.

  • 09 Oct 2026 09:09 AM (IST)

    वाल्मीक कराडनंतर चाटेचाही हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

    संतोष देशमुख हत्याकांडातीला आरोपीला मोठा दणका बसला आहे. वाल्मीक कराडनंतर विष्णू चाटेचाही हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे. त्याला एका वर्षानंतरच जामिनासाठी अर्ज करता येणार आहे.  बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने विष्णू चाटे याचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय.  मकोका तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यात चाटेचा प्रत्यक्ष व कटात सहभाग असल्याचे दर्शवणारे भक्कम पुरावे तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आलेत.

     

     

     

  • 09 Oct 2026 09:00 AM (IST)

    केंद्राचं दुष्काळ पाहणी पथक आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील नानेगाव गावात शेतकऱ्यांच्या बांधवर जाऊन सोयाबीन आणि कपाशी पिकांची पाहणी करणार आहे. तर अंबड तालुक्यातील किनगाव वाडी आणि जामखेड मध्ये देखील केंद्राच्या पथकाकडून फळबागांची पाहणी करण्यात येणार आहे.केंद्राच्या पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडी,अडचणी जाणून घेतल्या जाणार आहे

  • 09 Oct 2026 08:50 AM (IST)

    केंद्राचे दुष्काळी पथक आजपासून 2 दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    केंद्राचे दुष्काळी पथक आजपासून 2 दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असेल. केंद्रीय पथकाकडून बार्शी, उत्तर सोलापूर तालुक्यात आज पाहणी होणार आहे. तर उद्या सांगोला मंगळवेढा येथे कोरड्या दुष्काळाची पाहणी केली जाणार. आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेनयन यांनी ही माहिती दिली. केंद्राच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वात पथक येणार आहे.

  • 09 Oct 2026 08:40 AM (IST)

    आजपासून तुळजाभवानी मातेचे दर्शन २२ तास सुरू

    नवरात्रोत्सवात भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी आज पासून तुळजाभवानी मातेचे दर्शन २२ तास सुरू राहणार आहे. या कालावधीत पहाटे १ वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार असून, घटस्थापनेच्या दिवशी मात्र मंदिर मध्यरात्री १२.१५ वाजता उघडण्यात येणार होणार आहे. तुळजाभवानी मातेचा वर्षातील सर्वांत मोठा उत्सव असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाला ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. अश्विन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांतून लाखो भाविक तुळजापूरला येतात. भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन मंदिर संस्थांनी हा निर्णय घेतला आहे आज पासून ते २१ऑक्टोबरदरम्यान पहाटे १ वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.

  • 09 Oct 2026 08:30 AM (IST)

    सरकारचे शिष्ट मंडळ आज विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार का?

    पुण्यातील एस एम जोशी पुलावर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसह रोहित पवार गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये अनेक नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय मात्र सरकारच्या वतीने कुणीही आंदोलनाला भेट दिली नसून अजून देखील विद्यार्थ्यांशी कोणत्याही स्वरूपाची चर्चा झालेली नाही. आज सरकारच्या वतीने शिष्टमंडळ एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी येणार का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  विद्यार्थी एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत मात्र सरकारी पातळीवरून आंदोलनासंदर्भात अजून देखील कोणत्याही स्वरूपाच्या हालचाली होताना दिसत नाहीत. आम्हाला मुद्दाम त्रास दिला जातोय असा आरोप करून अलका चौकात गेलो तर उठणार नाही असा देखील इशारा रोहित पवार यांनी दिलाय..

  • 09 Oct 2026 08:20 AM (IST)

    भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांच्या भूमिकेकडे लक्ष

    नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. अनिल सोले हे भाजप नेत्यांपासून नॉट रीचेंबल असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने सुधाकर कोहळे यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर प्रा. सोले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सोले यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू मात्र प्रतिसाद नाही. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते मात्र ते भेटले नाही

  • 09 Oct 2026 08:10 AM (IST)

    मुंबईत पावसाळा संपल्यानंतर पारा वाढला

    मुंबईत पावसाळा संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उष्णतेचा पारा वाढला आहे. गुरूवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हे तापमान सामान्यपेक्षा तब्बल 4.5 अंशांनी अधिक असल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. त्यामुळे मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील काही भागांसाठी भारतीय हवामान विभागाने आज देखील उष्णतेचा ईशारा दिला आहे. मुंबईत 3 ऑक्टोबर रोजी नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर तापमानात मोठी वाढ झाली आहे. गुरूवारी मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत यंदाच्या वर्षातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले बुधवारी सांताक्रूझ येथे 35.4 अंश सेल्सिअस तापमान होते

  • 09 Oct 2026 08:00 AM (IST)

    नागपूरमध्ये सीजेपी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस

    उद्या दिल्लीत होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील सीजेपी च्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील सीजेपीचे कार्यकर्ते अक्षय रामटेके यांना कुही पोलीस स्टेशन कडून नोटीस देण्यात आली आहे १० ऑक्टोबरला दिल्लीत होणाऱ्या सिजेपी च्या आंदोलनात सहभागी होऊ नये असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक झालेली आहे. दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. काल काँग्रेसने शांततापूर्ण आंदोलनं केलं. आज विरोधी पक्षातील खासदार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्यापासून जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. तर उद्याच्या सीजेपीच्या आंदोलनात सहभागी न होण्याची नोटीस नागपूर पोलिसांनी यापूर्वीच्या आंदोलनकर्त्यांना दिली आहे.

पुण्यातील एस. एम. जोशी पूल परिसरात MPSC आंदोलन सुरू आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये असे न्यायालयाने मत नोंदवल्यानंतर पोलिसांनी हे ठिकाण तात्काळ खाली करण्याचे आवाहन आंदोलकांना केले आहे. तर आंदोलकांनी अद्याप हे स्थळ सोडलेले नाही. यामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. आज दिवसभर या घडामोडींकडे राज्याचे लक्ष असणार आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील मानपाड्याचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची 29 सप्टेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. याविरोधात आज सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

खरीप हंगाम 2026 मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे केंद्रीय पथख राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. कालपासून ते 11 ऑक्टोबरपर्यंत हे पथक राज्यातील विविध भागात जाणून दौरा करणार आहे. संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वात हे पथक तीन गटात राज्याची पाहणी करणार आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश असेल. त्यानंतर लागलीच मदतीची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us