AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naxalites: छत्तीसगडमध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक, 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश

Chhattisgarh Bijapur Police and Maoists Encounter: या वर्षी मार्च महिन्यापर्यंत देश माओवाद आणि नक्षलमुक्त करण्याचा विडा केंद्र सरकारने उचलला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणा आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक उडालेली आहे. आता बिजापूरच्या दक्षिण भागातील जंगलात तुफान धुमश्चक्री उडालेली आहे.

Naxalites: छत्तीसगडमध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक, 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश
छत्तीसगड, पोलीस-माओवाद्यांमध्ये चकमक
| Edited By: | Updated on: Jan 03, 2026 | 12:06 PM
Share

Chhattisgarh Bijapur Police and Maoists Encounter: या वर्षी मार्च महिन्यापर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचा विडा केंद्र सरकारने उचलला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणा आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक उडालेली आहे. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यातील कोटा कीष्टराम जंगलात दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे. आज पहाटेपासूनच ऑपरेशन सुरू झाला होता.डी आर जी व सीआरपीएफ पोलिसांच्या ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी जंगलात प्रवेश केल्यानंतर माओवादी संघटनेने हल्ला केला.त्याला प्रत्युत्तर देत जवळपास दीड तास चकमक चालली.माओवाद्यांचे 12 शवासह एके47 अत्याधुनिक रायफले पोलिसांनी जप्त केलेली आहे. कोटा येथील पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी ही माहिती दिली.

माओवाद्यी लपल्याची माहिती मिळताच कारवाई

सुरक्षा यंत्रणांना बिजापूर जिल्ह्यातील दक्षिण भागात 10-15 सशस्त्र माओवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भल्या पहाटे बस्तर भागातून कारवाईला सुरुवात झाली. डीआरजी पथकाने सर्व बाजूने नक्षलवाद्यांना घेरले. पोलीस आल्याची वार्ता मिळताच नक्षलवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षा दलाने त्याला प्रत्युत्तर दिले. सकाळपासून दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे. त्यात अनेक माओवादी ठार झाल्याचे समोर येत आहे. तर या जंगलात अजूनही थांबून थांबून गोळीबाराचे आवाज येत आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये दंतेवाडा-बिजापूर सीमारेषेवर सुरक्षा यंत्रणांनी कारवाई केली होती. या एनकाऊंटरमध्ये १२ नक्षलवाद्यांना मारण्यात आले होते. तर तीन जवान शहीद झाले होते. दोन्ही बाजूंनी काही जण जखमी झाले होते. मार्च महिना जवळ येत असून अनेक ठिकाणी माओवादी शरणागती पत्करत आहे. त्यामुळे नक्षलवादी चळवळ कमकुवत होत असल्याचेही समोर येत आहे. आता ही चळवळ काही जिल्ह्यांपुरतीच उरली आहे. तिथेही येत्या दोन महिन्यातून ती हद्दपार करण्यात येणार आहे.

तेलंगाणात बारसे देवासह 17 माओवाद्यांची शरणागती

तेलंगानामध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठे यश आले. माओवाद्यांची देशातील सर्वात लढवयी बटालियन असलेल्या पीपल्स लिबरेशन गोरील्ला आर्मी या बटालियन क्रमांक एकचा कमांडर बारसे देवासह 17 माओवाद्यांनी तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. माओवाद्याच्या संघटनेत सर्वाधिक लढवयी क्रूर आणि गनिमी कावा पद्धतीने सुरक्षा दलांना लक्ष करणारी ही बटालियन होती. या बटालियनच्या हल्ल्यात आत्तापर्यंत दंडकरण्यात 300 पेक्षा जास्त जवान ठार झाले आहेत. बारसे देवा हा महत्त्वाचा कमांडर या बटालियनचा प्रमुख आहे. या बटालियन चा बरीच वर्ष हीडमा प्रमुख होता. गेल्याच वर्षी बारसे देवाकडे हीडमाकडून या बटालियनची जबाबदारी देण्यात आली होती. बारसे देवावर सगळ्या राज्यांचा मिळून तीन कोटीचा बक्षीस आहे. आता तो साथीदारांसह शरण आल्याने मोठं यश आले आहे.

बिनविरोध निवडणुकांवर प्रश्नचिन्ह अन् संजय राऊत यांचा गंभीर आरोप
बिनविरोध निवडणुकांवर प्रश्नचिन्ह अन् संजय राऊत यांचा गंभीर आरोप.
सावित्रीबाई फुले यांची 195 वी जयंती, फुलेवाड्याला आकर्षक सजावट
सावित्रीबाई फुले यांची 195 वी जयंती, फुलेवाड्याला आकर्षक सजावट.
स्थानिक निवडणुकीच्या मतदानापूर्वी राजकीय नाट्य बंडखोरी, बघा गजब किस्से
स्थानिक निवडणुकीच्या मतदानापूर्वी राजकीय नाट्य बंडखोरी, बघा गजब किस्से.
मनसे पदाधिकाऱ्याची हत्या, थेट चाकूनं भोसकलं, भाजप नेत्यावर गंभीर आरोप
मनसे पदाधिकाऱ्याची हत्या, थेट चाकूनं भोसकलं, भाजप नेत्यावर गंभीर आरोप.
मुंबई महापालिका निवडणुकीत चौरंगी लढत, बंडखोरही गेम बिघडवणार?
मुंबई महापालिका निवडणुकीत चौरंगी लढत, बंडखोरही गेम बिघडवणार?.
चौकात ये, कसा जिंकतो बघतेच..नाशकात उमेदवारीवरून भाजपचे नेते आमने-सामने
चौकात ये, कसा जिंकतो बघतेच..नाशकात उमेदवारीवरून भाजपचे नेते आमने-सामने.
निकालाआधीच भाजप-शिंदे सेना बहुमताच्या जवळ? अन् ठाकरेंना धक्का
निकालाआधीच भाजप-शिंदे सेना बहुमताच्या जवळ? अन् ठाकरेंना धक्का.
पूजा मोरेंच्या वादात आता मराठा अँगल, उमेदवारी मागे अन् ट्रोलिंग चर्चेत
पूजा मोरेंच्या वादात आता मराठा अँगल, उमेदवारी मागे अन् ट्रोलिंग चर्चेत.
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच.