AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारचे LPG, CNG आणि PNG संदर्भात मोठे अपडेट! गॅस संकटादरम्यान सरकारची पावले

LPG latest updates: पश्चिम आशियातील संघर्षामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने आता धोरणात बदल केला आहे. एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सरकार अधिक काळजी घेत आहे. जनतेने अतिरिक्त साठेबाजी करु नये असे आवाहन सरकारने केले आहे.

सरकारचे LPG, CNG आणि PNG संदर्भात मोठे अपडेट! गॅस संकटादरम्यान सरकारची पावले
LPG
| Updated on: Apr 28, 2026 | 10:11 PM
Share

LPG latest updates: पश्चिम आशियात सुरु असलेल्या तणावाच्या दरम्यान भारतात गॅस पुरवठ्या संदर्भात लोकांच्या मनात चिंतेचे वातावरण नक्की वाढले आहे. मात्र, सरकारने स्पष्ट केल आहेत देशात घरगुती गॅस पुरवठ्या संदर्भात कोणातीही कमतरता पडू दिली जाणार नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या नुसार घरगुती एलपीजी सिलेंडर, पाईप्ड नॅचरल गॅस ( PNG ) आणि सीएनजी ( CNG ) ट्रान्सपोर्टसाठी १०० टक्के पुरवठा सुनिश्चित केला जात आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांनी गॅसच्या कमतरते संदर्भात घाबरण्याची गरज नाही. सरकार सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवून आहे आणि प्रयत्न सुरु आहे की आंतरराष्ट्रीय संकटाचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर कमीत कमी व्हावा.चला जरा विस्ताराने या संदर्भात माहिती पाहूयात..

सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की भले कच्चे तेल आणि गॅसच्या आयातीवर जागतिक घडामोडींचा परिणाम झाला असेल परंतू देशातील अंतर्गत पुरवठा साखळी मजबूत कायम ठेवली आहे. घरगुती ग्राहकांना प्राथमिकता दिली जात आहे, म्हणजे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये. यासोबतच एलपीजीचा पुरवठाही हळूहळू सामान्य होत आहे. सध्या ७० टक्क्यांपर्यंतचा एलपीजीचा पुरवठा बहाल झाला आहे. खास करुन हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांना सर्वात आधी गॅस उपलब्ध केला जात आहे. म्हणजे त्यांच्या कामकाजात व्यत्यय येऊ नये. या शिवाय फार्मा, स्टील, कृषी आणि बियाणे या सारख्या महत्वाच्या सेक्टर्सना देखील गॅस पुरवताना प्राधान्य दिले जात आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात कमर्शियल गॅसच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. रोजच्या विक्रीचे आकडे आधीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहे.

२२ राज्यांना अतिरिक्त पुरवठा

विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात व्यावसायिक एलपीजीच्या मागणीत मोठी वाढ दिसून आली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत दैनंदिन व्यावसायिक एलपीजी विक्रीचे आकडे जवळपास दुप्पट झाले आहेत. कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये गॅसची मागणी वेगाने वाढली आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, २२ राज्यांना अतिरिक्त १०% एलपीजीचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, स्थलांतरित कामगारांना गॅस सहज उपलब्ध व्हावा यासाठी त्यांच्यासाठी खास ५-किलोच्या लहान सिलिंडर्सचा पुरवठाही जवळपास दुप्पट करण्यात आला आहे.

पुरवठ्यात मोठी समस्या नाही

सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की गॅसच्या पुरवठ्यात कोणतीही मोठी समस्या नाही. घरगुती उपयागोसाठी साठी सुरक्षित ठेवला गेला आहे. फर्टीलायझल सेक्टरला सुमारे ९५ टक्क्यांपर्यंत गॅस पुरवठा केला जात आहे. उद्योगधंदे बंद पडू नयेत म्हणून औद्योगिक आणि व्यापारी सेक्टरला सुमारे ८० टक्के पुरवठा केला जात आहे.

गरजेपेक्षा जास्त गॅस खरेदी

काही ठिकाणी अफवांमुळे लोक गरजेपेक्षा जास्त गॅस खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सरकारने या विरोधात कठोर पावले उचलली आहेत. देशभरात २,८०० धाडी टाकण्यात आल्या आहेत. ज्यात हजारो सिलिंडर जप्त केले आहेत. अनेक लोकांच्या विरोधात कारवाई देखील करण्यात आली आहे.

जनतेला आवाहन

केंद्र सरकारने जनतेला आवाहन केले आहे की त्यांनी कोणत्याही अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि घाबरून गॅस, पेट्रोल किंवा डिझेलची खरेदी करू नये. देशात पुरेसा साठा असून पुरवठा पूर्णपणे सामान्य आहे, त्यामुळे गरजेनुसारच खरेदी करावी असे सरकारने म्हटले आहे.

Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.