AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का; पक्षाचं नाव अन् चिन्ह गेल्यानंतर ज्याची भीती तेच घडलं

ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आता पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उमेदवाराने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी थेट काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का; पक्षाचं नाव अन् चिन्ह गेल्यानंतर ज्याची भीती तेच घडलं
Mamata banerjeeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 18, 2026 | 6:01 PM
Share

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर आता नंदीग्राममधील उमेदवारानेही माघार घेतली आहे. पोटनिवडणुकीत उमेदवारी दिलेल्या संचिता प्रधान डे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतल्यानंतर मोठा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संचिता डे यांनी उमेदवारी मागे घेतली. संचिता डे यांच्या निर्णयाने ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठी एक दिवस राहिला आहे. पश्चिम बंगालमधील 2 जागांवर 6 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्याआधीच नंदीग्राममधील उमेदवार संचिता डे यांनी मुख्यमंत्री अधिकारी यांची भेट घेऊन मोठा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. भेट घेतल्यानंतर काही वेळात त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. ममता बॅनर्जी यांच्या हातातून पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर संचिता प्रधान डे यांनी अर्ज मागे घेतला. पश्चिम बंगालमध्ये रेजीनगर आणि नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचे नाव आणि चिन्ह गोठवलं आहे. त्यानंतर आयोगाने दोन्ही गटाकडून तीन-तीन पर्याय मागितले. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या गटाला ममता एआयटीएमसी’ नाव आणि फुटबॉलपटूचे चिन्ह देण्यात आले.

ममतांच्या पक्षाचा काँग्रेसला पाठिंबा

पश्चिम बंगालमधील (West Bengal) नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीत ममतांच्या पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. पाठिंबा दिल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर टीका केली. भाजप हा पक्ष घाणेरडा, वाईट, कुत्र्यासारखे वागणारा अत्यंत वाईट पक्ष आहे. आम्हाला भाजपचा अंत बघायचा आहे. नंदीग्राममध्ये काँग्रेसला पाठिंबा देणे ही भारतातील भाजपच्या अंताची सुरुवात आहे. ज्यांनी चार महिन्यांपूर्वी निवडणुका जिंकल्या आहेत, ते निवडणूक चिन्ह अवैध ठरवलं आहे, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली.  ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर आता नंदीग्राममध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट निवडणडणूक पाहायला मिळेल.

Follow Us
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात