AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mamata Banerjee Marriage: ममता दीदींनी का केले नाही लग्न? कारणही तितकेच मोठे…कधी दूध डेअरीवर करावे लागले काम…

Mamata Banerjee Marriage: ममता बॅनर्जी यांच्या राजकीय जीवनाचा प्रवास अस्ताकडे सुरू झाला आहे की पुढील पाच वर्षात दीदी पुन्हा मोठ्या दमाने भाजपचा सामना करणार याची चर्चा रंगली आहे. पराभवाविषयी टीएमसीत चिंतन सुरू झाले आहे. पण ममता दीदींनी लग्न का केले नाही, यामागील काय आहे कारण?

Mamata Banerjee Marriage: ममता दीदींनी का केले नाही लग्न? कारणही तितकेच मोठे...कधी दूध डेअरीवर करावे लागले काम...
ममचा बॅनर्जीImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 05, 2026 | 11:22 AM
Share

Mamata Banerjee Marriage: पश्चिम बंगालमधील पराभवाने ममता बॅनर्जी यांची देशभरात चर्चा सुरू आहे. त्याचवेळी बॅनर्जी यांनी लग्न का केले नाही, याचीही चर्चा आहे. दीदी यापूर्वी बंगालसारख्या मोठ्या राज्याच्या तीन वेळा मुख्यमंत्री होत्या. टीएमसी सारख्या मोठ्या पक्षाच्या त्या प्रमुख आहेत. खासदार, आमदार, मुख्यमंत्री, देशाच्या रेल्वेमंत्री अशा अनेक भूमिका त्यांनी निभावल्या आहेत. पण त्यांनी लग्न केले नाही. लग्न केल्यास समाजाला आणि जनतेला आपण वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे लग्न नकोच असे त्यांचे ठाम मत होते. अर्थात उत्तराधिकारी म्हणून त्यांनी पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांचीच निवड केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी का केले नाही लग्न?

ममता बॅनर्जी यांचे साधे राहणीमान लोकप्रिय आहे. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच सामाजिक आंदोलनापासून झाली. समाजसेवा आणि राजकारण हेच त्यांचे ध्येय होते. अशावेळी कुटुंबाला आपण वेळ देऊ शकणार नाही, त्यामुळे त्यांनी लग्न केले नाही. राज्य, महिला आणि पक्ष वाढीसाठी त्यांनी आयुष्य झोकून दिले. त्यांनी राजकीय जबाबदाऱ्यांना अधिक महत्त्व दिले. त्यांची जीवनशैली अत्यंत साधी आहे.

ममता बॅनर्जी यांचा जन्म कुठे झाला?

ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी 1955 रोजी कोलकत्ता येथे झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण कोलकत्त्यातून पूर्ण केले. त्यांनी कोलकत्ता विद्यापीठातून इतिहास विषयात पदवी मिळवली. तर इस्लामिक इतिहासात पदवीत्त्युर पदवी मिळवली. त्यांनी पुढे शिक्षण शास्त्र आणि कायद्याचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थी आंदोलनात उडी घेतली.

दूध डेअरीवर केले काम

ममता बॅनर्जीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अत्यंत कठीण झाले. तेव्हा घरची परिस्थिती अत्यंत बिकट झाली. तेव्हा उदरनिर्वाह आणि भावांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी त्यांना दूध डेअरीवर काम करावे लागले. या संघर्षातून त्यांचे कडवेपण लक्षात येते. त्यातून किशोरवयीन अवस्थेत त्यांचे मन पोळले गेले.

काँग्रेसमधून राजकारणाचे धडे नंतर तयार केला पक्ष

ममता बॅनर्जी यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेसमधून झाली. 1984 मध्ये पहिल्यांदा त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आणि सर्वात तरुण वयाच्या खासदार झाल्या. त्यानंतर त्या सतत राजकारणात सक्रिय राहिल्या. त्यानंतर काँग्रेसशी मतभेद झाले. त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. 2011 मध्ये त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. पश्चिम बंगालमधील 34 वर्षांची डाव्याची सत्ता उलथवली. त्या पहिल्यांदा मुख्यमंत्री ठरल्या.

Follow Us
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी