जिथं भाजपानं भगदाड पाडलं, तिथंच ममतांनी रणशिंग फुंकलं; कोण चितपट होणार?

जिथं भाजपानं भगदाड पाडलं, तिथंच ममतांनी रणशिंग फुंकलं; कोण चितपट होणार?
Mamata Banerjee

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्यापूर्वीच बंगालमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. (Mamata Banerjee to contest from Nandigram in West Bengal Assembly polls)

भीमराव गवळी

|

Jan 18, 2021 | 6:40 PM

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्यापूर्वीच बंगालमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ज्या नंदीग्राममध्ये भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला भगदाड पाडलं त्याच ठिकाणी ममता बॅनर्जी विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. आपल्याच जुन्या सहकाऱ्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्याच्याच विरोधात निवडणूक लढण्याचा जुगार ममता बॅनर्जी करत असल्याने त्यात त्या कितपत यशस्वी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. (Mamata Banerjee to contest from Nandigram in West Bengal Assembly polls)

भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. मात्र त्यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी 2016मध्ये तृणमूलच्या तिकिटावर नंदीग्राममधून निवडणूक लढवली होती. मात्र, सुवेंदू अधिकारी यांच्यासह खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की यांच्यासह 10 आमदारांनी गेल्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यातील पाच आमदार तृणमूलचे आहे. तृणमूलमधील हे आजवरचे सर्वात मोठं बंड असल्याचं मानलं जात होतं. खासदार, माजी खासदार आणि आमदारही पक्षाला सोडून गेल्याने नंदीग्राममध्ये तृणमूलच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत नंदीग्रामवर भाजपचं वर्चस्व निर्माण होऊ नये म्हणून ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याची घोषणा करून भाजपच्या खेळीला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे.

दक्षिण बंगालच्या राजकारणावर प्रभाव पडणार?

नंदीग्रामची निवड करून ममता यांनी अनेक समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. नंदीग्राममधील पक्षाचं वर्चस्व अबाधित राखण्याबरोबरच दक्षिण बंगालच्या राजकाणावर प्रभाव पाडण्याची ममता यांची खेळी आहे. डाव्या पक्षांच्याविरोधा सातत्याने आंदोलने करूनही तृणमूल काँग्रेसला नंदीग्राममध्ये फारसं यश आलं नव्हतं. 2006च्या डिसेंबरमध्ये सिंगूरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु झालं होतं. त्यानंतर 2007 मध्ये नंदीग्राममध्ये केमिकल हब बनविण्यासही विरोध सुरू झाला होता. त्यानंतर 14 मार्च रोजी शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. त्यात 14 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर 100 पेक्षा अधिक शेतकरी गायब झाले होते. त्यामुळे तत्कालीन बुद्धदेव भट्टाचार्य सरकारविरोधात जनमत गेलं होतं. नंदीग्राममधील जनतेच्या भावना सरकारविरोधात जाऊ नये म्हणूनही ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामची निवड केल्याचं राजकीय पंडितांचं म्हणणं आहे.

नंदीग्राम मला लकी

याशिवाय पश्चिम बंगालमध्ये भाजपने आक्रमकपणे प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने फोडाफोडीचं राजकारण सुरू करून तृणमूल नेत्यांना गळाला लावण्याचं काम सुरू केलं आहे. शिवाय हिंदू मतांचं ध्रृवीकरणही केलं जात आहे. तसेच ममता विरोधी जनमत निर्माण करण्यासाठीही भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. नंदीग्राम आपल्यासाठी लकी असल्याचंही त्या भाषणातून सांगत आहेत. (Mamata Banerjee to contest from Nandigram in West Bengal Assembly polls)

तृणमूलचं चॅलेंज

तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये आलेले सुवेंदू अधिकारी सध्या अधिकच चर्चेत आहेत. मिदनापूरमधील अनेक मतदारसंघावर त्यांचा प्रभाव पडेल असं बोललं जात आहे. अधिकारी हे 2016पासून नंदीग्रामचे आमदार आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. आता ममता बॅनर्जी नंदीग्राममधून मैदानात उतरल्यास भाजपही अधिकारींना ममतांविरोधात मैदानात उतरवणार का? याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे. ममता यांनी नंदीग्राममध्ये लढण्याची घोषणा केल्यानंतर तृणमूलने अधिकारींना ममतांविरोधात लढण्याचं चॅलेंज दिलं आहे. त्यामुळे अधिकारी निवडणूक मैदानात उतरतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अधिकारी निवडणुकीत उतरल्यास ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (Mamata Banerjee to contest from Nandigram in West Bengal Assembly polls)

संबंधित बातम्या:

कधी संपणार कोरोनाचं संकट? वाचा प्रख्यात व्हायरोलॉजिस्ट डॉ. जेकब काय म्हणतात…

स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत जाणं आता सोप्पं, जाणून घ्या मोदींनी उद्घाटन केलेल्या 8 रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक

बिल गेट्स बिहारचं कौतुक करतात,अमेरिकेतील बिहारी उद्योजकांनी मातृभूमीच्या विकासात साथ द्यावी: नितीश कुमार

(Mamata Banerjee to contest from Nandigram in West Bengal Assembly polls)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें