Hariyana: ‘मोक्ष’ प्राप्तीचा येडा नाद, लेकरं बाळं, बायको जीवानीशी बाद, एकाच घरात 5 मृतदेह, पोलीसांना कशाचा संदेह?

पोलिसांच्या माहितीनुसार, रमेशने नशेचे पदार्थ खाउ घातल्यानंतर कुदळ डोक्यात घालून पत्नी आणि तिन्ही मुलांची रात्री हत्या केली. नंतर विजेच्या तारेला गळफास घेऊन स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र विजेचा शॉक लागला नाही. यानंतर बारवाला रोडवर अज्ञात वाहनाखाली उडी घेत त्याने आपले जीवन संपवले.

Hariyana: 'मोक्ष' प्राप्तीचा येडा नाद, लेकरं बाळं, बायको जीवानीशी बाद, एकाच घरात 5 मृतदेह, पोलीसांना कशाचा संदेह?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 5:04 PM

हरियाणा : ‘मोक्ष’ प्राप्तीचा नादातून एका व्यक्तीने पत्नी आणि तीन मुलांची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणातील हिसारमध्ये घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच हिसारचे डीआयजी बलवान सिंह राणा, डीएसपी नारायण सिंह, आग्रोहा स्टेशन प्रभारी पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी अग्रोहा वैद्यकीय रुग्णालयात पाठवले.

मयत कुटुंब प्रमुखाचे नाव रमेश असून तो नांगथळा गावात आपली पत्नी सुनीता आणि मुलांसह राहतो. रमेशला 15 आणि 13 वर्षांच्या दोन मुली आणि 10 वर्षांचा मुलगा आहे. मयत रमेशचे अग्रोहा येथे दुकान होते, तिथे पेंटिंगचे काम करीत होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बरवाला रोडवर एक संशयास्पद मृतदेह पडला असल्याची माहिती अग्रोहा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता मृतदेहाच्या अंगावर जखमांच्या खुणा होत्या. त्यामुळे एखाद्या वाहनाच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्याचे रमेश असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पोलीस रमेशच्या घरी घटनेची माहिती देण्यासाठी पोहोचले.

रमेशच्या घरी पोहचल्यानंतर तेथील दृश्य पाहून पोलिसांसह गावकरीही हैराण झाले. घरामध्ये रमेशची पत्नी आणि मुलांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत पडलेले पोलिसांना आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौघांच्याही डोक्यावर कुदळाने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी अग्रोहा येथील रुग्णालयात नेले.

डायरीमुळे उलगडले हत्या आणि आत्महत्येचे रहस्य

घटनास्थळाची पाहणी करताना आणि पुरावे शोधताना पोलिसांना घरात रमेशची डायरी सापडली. या डायरीत रमेशने मृत्यूचे कारण आणि सर्वांचा मृत्यू कसा झाला याची माहिती होती. रमेशने डायरीत लिहिले होते की, ‘हे जग जगण्यास योग्य नाही, मला या जगात राहायचे नाही, पण माझ्या मृत्यूनंतर कुटुंबाचे काय होईल याचा विचार मनात आला, म्हणून मी रात्री खीर बनवली. त्यात नशेचे पदार्थ टाकले आणि ही खीर बायकोसह मुलांना खाऊ घातली.’

पोलिसांच्या माहितीनुसार, रमेशने नशेचे पदार्थ खाउ घातल्यानंतर कुदळ डोक्यात घालून पत्नी आणि तिन्ही मुलांची रात्री हत्या केली. नंतर विजेच्या तारेला गळफास घेऊन स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र विजेचा शॉक लागला नाही. यानंतर बारवाला रोडवर अज्ञात वाहनाखाली उडी घेत त्याने आपले जीवन संपवले. (Man commits suicide by killing his wife and children in Haryana)

इतर बातम्या

Girl Suicide | लैंगिक छळाला कंटाळून अकारावीतील मुलीनं जीव दिला! सुसाईड नोटमुळे गुंता वाढला

Nashik rape| केवढे हे क्रौर्य…चिमुरडीच्या नरडीवर सुरी ठेवून आईवर बलात्कार, नाशिक हादरले!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.