रामविलास पासवान यांना भारतरत्न द्या, राष्ट्रपतींना पत्र

दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थान आवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी यांनी केली आहे.

रामविलास पासवान यांना भारतरत्न द्या, राष्ट्रपतींना पत्र
त्यानंतर ते एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. गुजराल सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री झाले. केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी रामविलास पासवान हे केंद्रीय मंत्री असतात असा त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आहे.

पाटणा : लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थान आवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी यांनी केली आहे. मांझी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहीले आहे. (Jitan Ram Manjhi writes letter to President Ram Nath Kovind for demands confer Bharat Ratna on late Union Minister Ram Vilas Paswan)

रामविलास पासवान यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासोबत त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानाचे रुपांतर स्मारकात करण्याची मागणी देखील मांझी यांनी केली. “रामविलास पासवान जनतेचे नायक होते, यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा, असं मांझी यांनी पत्रात म्हटलं आहे.

“भारत सरकारमध्ये महत्वाच्या पदाची जबाबदारी पार पाडत असताना रामविलास पासवान यांचं निधन झालं. रामविलास पासवान यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. समाजासाठी त्यांनी केलेलं कार्य अद्वितीय आहे यामुळे ते भारताचे एक रत्न होते हे दिसून येते. रामविलास पासवान यांचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा. हीच देशवासियांकडून त्यांना खरी श्रद्धांजली असू शकते.” असं माझींनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान,शनिवारी (10 ऑक्टोबर) सांयकाळी रामविलास पासवान यांच्यावर शासकीय इतमामात पाटणा येथील दिघा घाटावर अंत्यसंस्कार कऱण्यात आले. पासवान यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री नीतीशकुमार, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव उपस्थित होते. चिराग पासवान यांनी वडिलांच्या चितेला मुखाग्नी दिला.

राम विलास पासवान यांचे निधन गुरुवार (8 ऑक्टोबर) ला झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

PHOTO : रामविलास पासवान यांचे निधन, राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान मोदी, शरद पवारांसह सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली

Ram vilas Paswan | अनंत आठवणींसह कोट्यवधींचा वारसा, रामविलास पासवान यांची संपत्ती किती?

(Jitan Ram Manjhi writes letter to President Ram Nath Kovind for demands confer Bharat Ratna on late Union Minister Ram Vilas Paswan)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI