Ram vilas Paswan | अनंत आठवणींसह कोट्यवधींचा वारसा, रामविलास पासवान यांची संपत्ती किती?

लोक जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं काल दीर्घ आजाराने निधन झाले. (Cabinet Minister Ram vilas Paswan asset and liability) 

Ram vilas Paswan | अनंत आठवणींसह कोट्यवधींचा वारसा, रामविलास पासवान यांची संपत्ती किती?

नवी दिल्ली : लोक जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं काल दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. “बाबा…. तुम्ही आता या जगात नाहीत, पण मला माहिती आहे की तुम्ही जिथेही असाल माझ्यासोबत नेहमी असाल”, असं भावनिक ट्वीट चिराग पासवान यांनी केलं. (Cabinet Minister Ram vilas Paswan asset and liability)

काही दिवसांपूर्वी रामविलास पासवान यांच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. पासवान यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र आणि लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर घरासह कुटुंबाची जबाबदारी पडली आहे.

रामविलास पासवान यांची एकूण संपत्ती किती?

रामविलास पासवान यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी 1 कोटींहून अधिक संपत्ती असल्याचं प्रतिज्ञातपत्रात दिली होती. तर त्यांच्यावर 50 लाखांहून अधिक कर्ज असल्याची माहिती National Data Repository दिली आहे. इतकंच नव्हे तर रामविलास पासवान यांच्याकडे जवळपास 1 लाख 5 हजार रुपयांची रोख रक्कम असून बँकेत जमा खात्यात 66 लाख 47 हजार रुपये आहेत.

अनेक मोठेमोठे नेते विविध ठिकाणी गुतंवणूक करुन ठेवतात. मात्र रामविलास पासवान यांनी काही खास गुंतवणूक केलेली नाही. एनडीआरच्या मते, पासवान यांच्याकडे बॉन्ड, डिबेंचर, एनएसस, पोस्टल सेव्हिंग यासारख्या कोणत्याही बचत खात्यात त्यांनी काहीही गुतंवणूक केलेली नाही. त्यांच्याकडे 6 लाख 9 हजार रुपयांची सोन्यात गुंतवणूक केली आहे.

रामविलास पासवान यांनी प्रॉपर्टीत 6 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. तर त्यांच्याकडे 15 लाख रुपयांची शेतजमीन आहे. याशिवाय बिहारची राजधानी पाटनामध्ये त्यांच्या नावे एक घर आहे. ज्याची किंमत पाच लाख रुपये आहे.

निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात आणखी एका घराबाबत उल्लेख केला आहे. त्याची किंमत जवळपास ९० लाख रुपये असल्याचं म्हटलं आहे. (Cabinet Minister Ram vilas Paswan asset and liability)

संबंधित बातम्या : 

Ram Vilas Paswan | रामविलास पासवान : राजकीय हवेचा अंदाज अचूक ओळखणारा नेता

Ram Vilas Paswan | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI