कोरोनाचा दणका, हजार कंपन्या चीन सोडणार?

सध्या चीनमधून अनेक मोठ्या कंपन्या काढता पाय घेण्याच्या तयारीत आहेत (Many companies trying to left China amid Corona).

कोरोनाचा दणका, हजार कंपन्या चीन सोडणार?
Follow us
| Updated on: May 09, 2020 | 11:01 PM

मुंबई : चीनमधील वुहान या शहरापासून सुरु झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग पुढे जगभरात झाला. त्यामुळे अमेरिकेपासून जगभरातील अनेक देश चीनलाच कोरोनाच्या संसर्गासाठी जबाबदार धरत आहेत. अमेरिकेने तर चीननेच हा विषाणू तयार केल्याचा आरोपही केला. त्यावर चीनने देखील अमेरिकेन सैन्याच्या प्रयोगशाळेत हा विषाणू तयार झाल्याचा प्रत्यारोप केला. या सर्व घडामोडींनंतरही चीनने कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणल्याचा दावा केला आहे. असं असलं तरी सध्या चीनमधून अनेक मोठ्या कंपन्या काढता पाय घेण्याच्या तयारीत आहेत (Many companies trying to left China amid Corona). याच्याकडेच लक्ष देत भारतातील अनेक राज्य या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे.

कोरोनाच्या संसर्गानंतर आता चीनमधील तब्बल 1 हजार कंपन्या चीन सोडण्याच्या विचारात आहेत. यात जपान, अमेरिका, यूरोप आणि कोरियाच्या कंपन्यांचा समावेश आहे. जवळपास 300 मोबाईल कंपन्या, इलेक्ट्रॉनिक, मेडिकल कंपन्या, टेक्सटाईल्स आणि सिंथेटिक फॅब्रिक्सच्या कंपन्या चीनमधून बाहेर पडण्याची तयार करत आहेत. याच कंपन्यांना आपल्या राज्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजप शासित 3 राज्यांनी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे.

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशनं कामगार कायद्यात बदल करुन अध्यादेश काढला आहे. परदेशातील कंपन्यांना गुंतवणूक करण्यास अडचण येणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाप्रमाणंच गुजरातनंही कामगार कायद्यात बदल करण्याची घोषणा केली आहे. गुजरात सरकारनं 33 हजार हेक्टर जमीन चीनमधून येणाऱ्या कंपन्यांसाठी तयार ठेवली आहे. इतर राज्यांनी चीनमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला असतानाच महाराष्ट्राकडून विशेष प्रयत्न होताना दिसत नाही.

या परिस्थितीवर बोलताना महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, “चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पडत आहेत. त्यांचा भारताकडे ओढा आहे. भारतातही या कंपन्यांची पहिली पसंती महाराष्ट्राला राहिली आहे. महाराष्ट्रात उद्योगांसाठी असलेल्या सुविधा, येथील औद्योगिक वातावरण आणि महाराष्ट्रात उपलब्ध असलेलं कुशल मनुष्यबळ यामुळे हे उद्योग आपल्याकडे येऊ इच्छित आहेत.” चीनने जगभरातील कंपन्यांना जमीन, वीज, पाणी, मजूर आणि कायद्यात सवलत या 5 गोष्टी देऊन मोठं मार्केट उभं केलं. मात्र आता कोरोनामुळं चीनला जोरदार झटका बसताना दिसतो आहे. त्यामुळं त्याचाच फायदा उचलण्यासाठी भारतातील अनेक राज्ये प्रयत्न करताना दिसत आहेत.

Many companies trying to left China amid Corona

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.