MiG-21 Crash Video : राजस्थानमध्ये सैन्यदलाचे मिग-21 फायटर प्लेन कोसळलं, दोन्ही पायलटचा अपघातात मृत्यू

या अपघाताने सध्या खळबळ माजली आहे. यात आणखीही काही महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. हे अपघात सैन्याची डोकेदुखी ठरू लागले आहेत.

MiG-21 Crash Video : राजस्थानमध्ये सैन्यदलाचे मिग-21 फायटर प्लेन कोसळलं, दोन्ही पायलटचा अपघातात मृत्यू
राजस्थानमध्ये सैन्यदलाचे मिग-21 फायटर प्लेन कोसळलं, दोन्ही पायलटचा अपघातात मृत्यूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 10:42 PM

भीमडा: राजस्थानमध्ये(Rajasthan) सैन्यदलाचे मिग फायटर(MiG-21 Crash) प्लेन कोसळलं आहे. या विमान अपघातात दोन्ही पायलटचा मृत्यू (Pilot Death) झाला आहे. विमान कोसळल्यानंतर मोठे आगीचे लोळ उठले.  गुरुवारी रात्री नऊच्या सुमारासव ही दुर्घटना घडली. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेचा थरार व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात अपघातानंतर विमानाच्या अवशेषाला आग लागल्याचे दिसत आहे. जमिनीवर पायलटचा मृतदेहही दिसत आहे. राजस्थानमधील बारमेरमध्ये हा अपघात झाला. बैतू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमडा येथे जोरदार स्फोट होऊन विमान पडले. स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिक घटनास्थळी दाखल झाले.  यानंतर त्यांनी पोलिस-प्रशासनाला याबबात माहिती दिली.  मिग विमानाचा ढिगारा अर्धा किलोमीटरवर पसरला आहे.

पाहा विमान अपघाताचा पाहा थरारक व्हिडिओ

गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी देखील भारतीय हवाई दलाचे मिग-21 लढाऊ विमान राजस्थानमधील जैसलमेरजवळ कोसळले होते. या अपघातात पायलट विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झाला. विंग कमांडर हर्षित सिन्हा यांनी जैसलमेर एअरफोर्स स्टेशनवरून नियमित विमानाने उड्डाण केले. अपघात स्थळ जैसलमेरपासून 70 किमी अंतरावर होते. विमानाला हवेत आग लागली, त्यानंतर ते धक्क्याने जमिनीवर आले.

राजस्थानमध्ये 8 वर्षात 7 लढाऊ विमाने कोसळली

  1. 12 फेब्रुवारी 2013: उत्तरलाईपासून अवघ्या 7 कि.मी. अनानी की धानी कुडलाजवळ मिग-21 क्रॅश, पायलट सुरक्षित.
  2. 7 जून 2013: उत्तरलाईपासून 40 कि.मी. दूरच्या सोडियारमध्ये मिग-21 क्रॅश, पायलट सुरक्षित.
  3. 15 जुलै 2013 : उत्तरलाईपासून 4 कि.मी. वांद्रे येथे मिग-27 क्रॅश, पायलट सुरक्षित.
  4. 27 जानेवारी 2015: बारमेरमधील शिवकर रोडवर मिग-21 क्रॅश, पायलट सुरक्षित.
  5. 10 सप्टेंबर 2016: माली की धानी बारमेरमध्ये मिग-21 क्रॅश, पायलट सुरक्षित.
  6. 15 मार्च 2017: शिवकरजवळ सुखोई-30 क्रॅश, पायलट सुरक्षित.
  7. 25 ऑगस्ट 2021: मतसर भुर्तिया येथे मिग-21 बायसन क्रॅश, पायलट सुरक्षित.

रशिया आणि चीननंतर भारत हा मिग-21 चा सर्वात मोठा ऑपरेटर आहे

रशिया आणि चीननंतर भारत हा मिग-21 चा तिसरा सर्वात मोठा ऑपरेटर आहे. 1964 मध्ये हे विमान पहिले सुपरसॉनिक फायटर जेट म्हणून हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. सुरुवातीची जेट विमाने रशियात बनवली गेली आणि नंतर भारताने हे विमान असेंबल करण्याचे अधिकार आणि तंत्रज्ञान मिळवले. तेव्हापासून, 1971 च्या भारत-पाक युद्ध, 1999 च्या कारगिल युद्धासह अनेक प्रसंगी मिग-21 ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. रशियाने 1985 मध्ये या विमानाचे उत्पादन बंद केले, परंतु भारत त्याचे अपग्रेड केलेले प्रकार वापरत आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.