करोडपती प्रॉपर्टी डिलरच्या पत्नीचे 13 वर्षांनी लहान रिक्षाचालकासोबत पलायन

मिळालेल्या माहितीनुसार, प्रॉपर्टी व्यावसायिकाच्या 45 वर्षीय पत्नीचे ऑटो रिक्षाचालक इम्रानसोबत प्रेमसंबंध होते. व्यावसायिकाची पत्नी इम्रानसोबत घरातून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

करोडपती प्रॉपर्टी डिलरच्या पत्नीचे 13 वर्षांनी लहान रिक्षाचालकासोबत पलायन
करोडपती प्रॉपर्टी डिलरच्या पत्नीचे 13 वर्षांनी लहान रिक्षाचालकासोबत पलायन
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 10:59 PM

इंदूर : आपल्यापेक्षा 13 वर्षांनी लहान रिक्षा चालक असलेल्या प्रियकरासोबत करोडपती प्रॉपर्टी डिलरची पत्नी पळून गेल्याची घटना इंदूरमध्ये उघडकीस आली आहे. इंदूरमध्ये एका प्रॉपर्टी व्यावसायिकाची 45 वर्षीय पत्नी बेपत्ता झाली होती, त्यानंतर पोलिस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीचीही नोंद करण्यात आली होती. त्याचवेळी पोलिसांनी तपास सुरू केला असता कुटुंबीयांनी दुसरी तक्रार दाखल केली. त्यानुसार व्यावसायिकाच्या घरातून सुमारे 47 लाख रुपयांचा ऐवजही चोरीला गेला आहे. मात्र, तपासादरम्यान पोलिसांनी एका आरोपीला अटक करून 30 लाख रुपये जप्त केले आहेत. त्याचबरोबर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा प्रेमप्रकरणातून तपास करत आहेत. (Millionaire property dealer’s wife escapes with rickshaw puller in indur)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रॉपर्टी व्यावसायिकाच्या 45 वर्षीय पत्नीचे ऑटो रिक्षाचालक इम्रानसोबत प्रेमसंबंध होते. व्यावसायिकाची पत्नी इम्रानसोबत घरातून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पळून जाताना दोघांनी सुमारे 30 लाख रुपये रितेश ठाकूर नावाच्या तरुणाला दिले आणि उर्वरित 17 लाख रुपये घेऊन दोघेही पळून गेले. घराच्या मुख्य लॉकरची चावी पत्नीकडे असून तिनेच पैसे काढले असावेत, असेही समोर आले आहे. असे असले तरी पोलिसांनी रितेश नावाच्या तरुणाला अटक करून त्याची चौकशी सुरू केली आहे.

काय म्हणाले पोलीस ?

खजराना पोलिस स्टेशनचे प्रभारी दिनेश वर्मा यांनी सांगितले की, खजराना पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता महिलेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये महिलेचा शोध सुरू आहे आणि याच प्रकरणात नवा ट्विस्ट आला की, बेपत्ता महिलेच्या पतीने तक्रार केली आहे की, त्यांच्या घरातून पैसे गायब झाले आहेत. त्याचवेळी इम्रान नावाच्या ऑटोचालकानेच पत्नीला घेऊन गेल्याचा पतीला संशय आहे. दुसरीकडे, रिक्षाचालकाचा साथीदार रितेश याला पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून 30 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून रक्कम जप्त करण्यात आली आहे.

खजराना पोलिस स्टेशन प्रभारी म्हणाले की, महिला आणि इम्रानचा शोध सुरू असून पोलिसांचे पथक गुजरातमधील दाहोद आणि वडोदरा येथेही शोधासाठी गेले होते. महिलेला ताब्यात घेतल्यानंतरच सत्य समोर येईल. त्याचवेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रानने पैसे चोरून आपल्या साथीदाराला दिल्याचे आणि उर्वरित रक्कम त्याने सोबत घेतल्याचे समोर आले आहे. तर प्रेमसंबंधामुळे ही महिला घरातून निघून गेल्याचेही पोलिसांनी सुरुवातीला सांगितले. (Millionaire property dealer’s wife escapes with rickshaw puller in indur)

इतर बातम्या

Prabhakar Sail | प्रभाकर साईल यांना एनसीबीकडून समन्स, वानखेडेंवर केलेल्या आरोपानंतर चौकशी होणार

भरती प्रक्रियेत पुन्हा गोंधळ, हॉलतिकीट ग्राह्य न धरण्याचे विद्यार्थ्यांना मेसेज, न्यासा कंपनीविरोधात तक्रार दाखल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.