मोठी बातमी : सर्वसामान्यांसाठी स्विमिंग पूल सुरु होणार, चित्रपट गृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढणार, केंद्र सरकारची नवी गाईडलाईन्स

मोठी बातमी : सर्वसामान्यांसाठी स्विमिंग पूल सुरु होणार, चित्रपट गृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढणार, केंद्र सरकारची नवी गाईडलाईन्स

देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत (Ministry of Home affairs issues new guidelines regarding corona virus)

चेतन पाटील

|

Jan 27, 2021 | 8:21 PM

नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या नव्या गाईडलाईन्सनुसार फेब्रुवारी महिन्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी स्विमिंग पूल सुरु होऊ शकणार आहेत. त्याचबरोबर चित्रपट गृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढणार आहे. ही नवी गाईडलाईन्स येत्या 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या गाईडलाईन्स देशातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होणार आहेत (Ministry of Home affairs issues new guidelines regarding corona virus).

नव्या गाईडलाईन्सनुसार कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जुन्या गाईडलाईन्सचे इतर नियमदेखील पाळावे लागणार आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे (Ministry of Home affairs issues new guidelines regarding corona virus).

याआधी चित्रपट गृहांमध्ये 50 टक्के प्रेक्षकांसाठी परवानगी देण्यात आली होती. आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजकीय आणि धार्मिक आंदोलनांना परवानगी देण्याबाबतची जबाबदारी राज्य सरकारांना देण्यात आली आहे.

नव्या गाईडलाईन्सनुसार, नागरी उड्डाण मंत्रालय आंतरराष्ट्रीय फ्लाईट अधिक क्षमतेने सुरु करण्यासाठी गृह मंत्रालयासोबत चर्चा करुन निर्णय घेऊ शकते.

गाईडलाईन्समध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर व्यक्ती, गर्भवती महिला आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र, त्याची सक्ती नाही. याशिवाय सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाच्या नियमावलींचं पालन करणं अनिवार्य राहील.

मुंबईची लोकलही लवकर सुरु होणार

मुंबईची लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी लवकर सुरु होणार असल्याती माहिती, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. “मुंबईची लोकल सेवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने पश्चिम रेल्वे आणि सेंटर रेल्वे फ्रिक्वेन्सी वाढवली पण मुंबईकरांना याचा लाभ मिळावा यासाठी अॅक्‍शन प्लॅन, राज्य सरकारचा स्टॅंडर्ड ऑपरेटिग प्रोसिजर ( Sop) तयार करण्यात आलाय. त्यानुसार रेल्वेसेवेचं वेळापत्रक निश्चित केलं जाईल”, असं अस्लम शेख यांनी सांगितलं.

हेही वाचा : VIDEO : कचरा वेचणाऱ्या माऊशीने कुत्र्याचा जीव वाचवला, नेटीझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें