Moderna Vaccine : 12 ते 17 वर्षाच्या मुलांसाठी मॉडर्नाची लस प्रभावी? FDA कडे अर्ज करणार

Moderna Vaccine : 12 ते 17 वर्षाच्या मुलांसाठी मॉडर्नाची लस प्रभावी? FDA कडे अर्ज करणार
Moderna vaccine

अमेरिकेतील लस निर्मिती कंपनी मॉडर्नाने मुलांवरील लसीच्या प्रभावाबाबत मोठा दावा केलाय. मॉडर्नाची लस 12 वर्षांवरील मुलांवर प्रभावी आणि सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केलाय.

सागर जोशी

|

May 25, 2021 | 9:42 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. असं असलं तरी निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी मात्र मुलांना कोरोनाची लागण झाली तरी त्यांच्यातील लक्षणं सौम्य असतील आणि त्यांना क्वचितच रुग्णालयात दाखल करावं लागेल, असं म्हटलंय. या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी समोर येत आहे. अमेरिकेतील लस निर्मिती कंपनी मॉडर्नाने मुलांवरील लसीच्या प्रभावाबाबत मोठा दावा केलाय. मॉडर्नाची लस 12 वर्षांवरील मुलांवर प्रभावी आणि सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केलाय. (Moderna vaccines claim to be effective in children)

मॉडर्ना कंपनीने केलेल्या ट्रायलमध्ये 12 ते 17 वयोगटातील 3 हजार 700 मुलांचा सहभाग होता. ज्या मुलांना मॉडर्ना लसीचे डोस देण्यात आले होते त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही. असोसिएटेड प्रेसच्या दाव्यानुसार 2 हजार 488 मुलांना मॉडर्नाची लस देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर कंपनी आता अमेरिकेतील रेग्युलेटरी बॉडी FDA कडे जूनमध्ये अर्ज करणार आहे.

एस्ट्राझेनेकाकडूनही 6 ते 17 वर्षाच्या मुलांवर ट्रायल सुरु

FDA ने चालू महिन्यात फायझर आणि बायोएनटेक लसीला 12 ते 15 वर्षांपर्यंतच्या मुलासाठी परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमी मॉडर्ना लसीला मंजुरी मिळाल्यास अमेरिकेत मुलांसाठी दोन लसी उपलब्ध होणार आहेत. फायझर आणि बायोएनटेक, तसंच मॉडर्नासह ब्रिटनमधील लस निर्माती कंपनी एस्ट्राझेनेकानेही 6 ते 17 वर्षाच्या मुलांवर कोरोना लसीच्या परिणामांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

जून महिन्यापासून लहान मुलांवर कोव्हॅक्सिनची ट्रायल

भारत बायोटेकचे अधिकारी डॉ. राचेस एल्ला यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भातील संकेत दिले. आम्ही जून महिन्यापासून कोव्हॅक्सिनच्या पीडियाट्रिक ट्रायलला सुरुवात करत आहोत. त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये जागतिक आरोग्य संघटना लहान मुलांवर कोव्हॅक्सिनचा वापर करण्यासाठी परवानगी देईल, अशी आशा डॉ. राचेस एल्ला यांनी व्यक्त केली.

सध्या कोव्हॅक्सिनचे उत्तम परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचत आहेत. आम्ही लवकरच लसीचे उत्पादन वाढवू. यंदाच्या वर्षाअखेरपर्यंत आम्ही 70 कोटी लसींचे उत्पादन करु, असा दावाही डॉ. राचेस एल्ला यांनी केला. केंद्र सरकारने भारत बायोटकेला 1500 कोटी रुपयांच्या कोरोना लशींची ऑर्डर दिली आहे.

संबंधित बातम्या :

लहान मुलांसाठी नाकावाटे दिली जाणारी लस ठरणार ‘गेमचेंजर’; डब्ल्यूएचओच्या वैज्ञानिकांनी केला दावा

ब्लॅक फंगसचं रौद्ररुप, आतापर्यंत 7000 रुग्णांचा मृत्यू, AIIMS च्या संचालकांकडून अहवाल सादर

Moderna vaccines claim to be effective in children

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें