AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5000 कोटींचा मालक, प्रथमच खासदार, आता मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार कोण आहेत हे खासदार…

tdp chandrashekar panchami: राजकारणाव्यतिरिक्त उद्योजक जगात चंद्रशेखर कार्यरत आहे. ते Uworld चे संस्थापक आणि CEO आहेत, एक ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करते. 2020 मध्ये अर्न्स्ट आणि यंग एंटरप्रेन्योर ऑफ द इयर अवॉर्ड जिंकल्यावर त्याला ओळख मिळाली.

5000 कोटींचा मालक, प्रथमच खासदार, आता मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार कोण आहेत हे खासदार...
tdp chandrashekar panchami
| Updated on: Jun 09, 2024 | 2:41 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळास आज सुरुवात होणार आहे. मोदी सरकार 3.0 चा शपथविधी समारंभ संध्याकाळी होत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी मंत्रीपद मिळणाऱ्या सर्व खासदारांना फोन सकाळीच गेले. त्यानंतर ते नवी दिल्ली दाखल झाले. मोदी 3.0 सरकारमध्ये एक चेहरा असा असणार आहे की त्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. प्रथमच खासदार आणि पाच हजार कोटींचे मालक असलेल्या चंद्रशेखर पेम्मासानी नेमके कोण आहेत?

साडेतीन लाख मतांनी विजय

आंध्र प्रदेशातील चंद्रबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष एनडीएमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्या पक्षाचे 16 खासदार निवडून आले आहे. या पक्षाचे दोन जण मंत्री होणार आहे. त्यात राम मोहन नायडू आणि चंद्रशेखर पेम्मासानी यांचा समावेश आहे. पेम्मसानी हे आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभेतून निवडून आले आहेत. त्यांनी पोन्नूरमधील विद्यमान वायएसआरसीपी आमदार किलारी वेंकट रोसैया यांचा सुमारे साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता. चंद्रशेखर यांना 8 लाख 64 हजार 948 मते मिळाली होती, तर व्यंकट रोसय्या यांना 5 लाख 20 हजार 253 मते मिळाली होती. पेम्मासानी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 5705 कोटी रुपये आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ते सर्वात श्रीमंत उमेदवार होते.

डॉक्टर ते उद्योजक…चंद्रशेखर

पेम्मासानी यांनी 1999 मध्ये एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमधून एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर, 2005 मध्ये, त्यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील गेसिंजर मेडिकल सेंटरमधून इंटर्नल मेडिसिनमध्ये एमडी पदवी प्राप्त केली. परदेशात राहूनही पेमसानी यांनी गुंटूर मतदार संघात संबंध कायम ठेवले आणि आता येथून निवडून आले त्यानंतर ते मोदी सरकार 3.0 मध्ये मंत्री होत आहेत. पेमसानी यांनी अलीकडेच राजकारणात प्रवेश केला असे नाही. ते यापूर्वी टीडीपीमध्ये सक्रीय आहे.

Uworld चे संस्थापक…

राजकारणाव्यतिरिक्त उद्योजक जगात चंद्रशेखर कार्यरत आहे. ते Uworld चे संस्थापक आणि CEO आहेत, एक ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करते. 2020 मध्ये अर्न्स्ट आणि यंग एंटरप्रेन्योर ऑफ द इयर अवॉर्ड जिंकल्यावर त्याला ओळख मिळाली. भारत आणि यूएस मधील 100 हून अधिक कंपन्या आणि मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून डॉ. पेम्मासानी यांची संपत्ती पाच हजार कोटींपेक्षा जास्त आहे. त्याच्या जंगम मालमत्तेत दोन मर्सिडीज कार, एक टेस्ला आणि एक रोल्स रॉयस यांचा समावेश आहे.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.