AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारचं मोठं यश! भारतातील गरीबी घटली, आता फक्त ‘इतके’ लोक गरीब

देशातील गरिबांच्या संख्येत मोठी घट झाली आहे याची आकडेवारी जागतिक बँकेने सादर केली आहे. भारतात २०११-१२ मध्ये गरीब लोकांची टक्केवारी २७.१ टक्के होती, जी आता घटली आहे.

मोदी सरकारचं मोठं यश! भारतातील गरीबी घटली, आता फक्त 'इतके' लोक गरीब
| Updated on: Jun 08, 2025 | 3:11 PM
Share

गेल्या ११ वर्षांपासून केंद्रात भाजपप्रणित सरकार आहे. या काळात भारताने गरीबीवर विजय मिळवल्याची माहिती समोर आली आहे. देशातील गरिबांच्या संख्येत मोठी घट झाली आहे याची आकडेवारी जागतिक बँकेने सादर केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जागतिक बँकेचा अहवाल

जागतिक बँकेने सादर केलेल्या अहवालानुसार, भारतातील गरिबीत राहणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. भारतात २०११-१२ मध्ये गरीब लोकांची टक्केवारी २७.१ टक्के होती, ती २०२२-२३ मध्ये ५.३ टक्के झाली आहे. त्यामुळे आता भारतात केवळ ५.३ टक्के लोक गरीब आहेत.

जागतिक बँकेने गरिबीची व्याख्या बदलली असून जो व्यक्ती प्रतिदिन तीन डॉलरपेक्षा कमी कमावतो ते गरीब गणला जातो. जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे की, २०१७ ते २०२१ दरम्यान भारताचा महागाई दर थोडा जास्त होता. त्यामुळे गरिबीची २०२१ मधील २.१५ डॉलर मर्यादा १५ टक्क्यांनी वाढून ३ डॉलर करण्यात आली आहे.

मोफत रेशनमुळे गरिबी हटली

समोर आलेल्या माहितीनुसार, मोफत रेशन योजनेमुळे भारतातील गरीबी कमी झाली आहे. जागतिक बँकेच्या अहवालात असे म्हटले आहे की, ५४ टक्के गरीब लोक पाच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये राहतात. मात्र गरीबीची ही आकडेवारी आगामी काळात बदलण्याची शक्यता आहे.

जागतिक बँकेच्या मते, गेल्या दशकात भारतातील गरिबीत लक्षणीय घट झाली आहे. भारतातील गरिबी (दररोज $2.15 पेक्षा कमी उत्पन्नावर जगणे) 2011-12 मध्ये 16.2 टक्क्यांवरून 2022-23 मध्ये 2.3 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. तसेच ग्रामीण भागातील गरिबी 18.4 टक्क्यांवरून 2.8 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे आणि शहरी भागात ती 10.7 टक्क्यांवरून 1.1 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे, ज्यामुळे ग्रामीण-शहरी अंतर 7.7 टक्क्यांवरून 1.7 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने जागतिक बँकेच्या अहवालावर एक पत्रक जारी करत म्हटले की, देशातील अति गरिबी १८.४ टक्क्यांवरून १.७ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. यामुळे १७१ दशलक्ष लोक या रेषेच्या वर आले आहेत. मात्र जगाचा विचार करता, जागतिक स्तरावर गरिबांची संख्या १२५ दशलक्षने वाढली, तर भारतात ही संख्या कमी झाली ही समाधानकारक बाब आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.