AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वक्फ मालमत्तेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, UMEED पोर्टल लाँच

केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने वक्फ मालमत्तेच्या नोंदणीसाठी उमीद(UMEED) हे पोर्टल सुरू केले आहे. याद्वारे मालमत्तेचा १७ अंकी युनिक आयडी तयार केला जाणार आहे.

वक्फ मालमत्तेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, UMEED पोर्टल लाँच
Waqf Board Umeed Portal
| Updated on: Jun 06, 2025 | 10:59 PM
Share

केंद्र सरकारने वक्फ मालमत्तेबाबत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने वक्फ मालमत्तेच्या नोंदणीसाठी उमीद(UMEED) हे पोर्टल सुरू केले आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिल्लीत या पोर्टलचे उद्घाटन केले. सर्व राज्यांच्या वक्फ बोर्डाचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून यावेळी उपस्थित होते.

उमीद पोर्टलची वैशिष्ट्ये

उमीद(UMEED) हे पोर्टल वक्फ कायद्याअंतर्गत तयार करण्यात आलेले आहे. यावर ईमेल आणि मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या OTP द्वारे लॉग इन करता येते. तसेच हे पोर्टल तीन स्टेपमध्ये काम करणार आहे.

1. Maker- मुतवल्ली किंवा राज्य वक्फ बोर्डाने अधिकृत केलेली कोणतीही व्यक्ती वक्फ मालमत्तेची नोंदणी करु शकेल.

2. Checker- जिल्हा स्तरावरील कोणताही अधिकारी मुतवल्लीने भरलेली माहिती तपासेल.

3. Approver: वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा राज्य वक्फ बोर्डाने अधिकृत केलेला कोणताही अधिकारी वक्फ म्हणून मालमत्तेची नोंदणी करण्यास मान्यता देऊ शकणार आहे.

१७ अंकी युनिक आयडी तयार केला जाणार

उमीद पोर्टलवर अपलोड केलेला डेटा व्यवस्थित की नाही हे तपासण्यासाठी ड्रॉपडाउन इनपुटची एक सिस्टाम तयार करण्यात आली आहे. यामुळे पोर्टलवर माहिती अपलोड करताना युजरला मदत मिळणार आहे. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर मालमत्ता नोंदणीची प्रक्रिया फक्त एका टप्प्यात केली जाणार आहे. त्यानंतर पोर्टल प्रत्येक वक्फ मालमत्तेसाठी १७ अंकी युनिक आयडी तयार करेल. यामुळे सर्व वक्फ मालमत्तेचा डिजिटल रेकॉर्ड तयार होणार आहे. या युनिक आयडीद्वारे वक्फ मालमत्तेचे स्वरूप, पत्ता आणि इतर माहिती शोधणे सोपे होणार आहे. तसेच नोंदणीकृत मालमत्तेला प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे.

वक्फ मालमत्तेचा युनिक आयडी काय असेल?

पोर्टलवर नोंदणी असलेल्या प्रत्येक नोंदणीकृत वक्फ मालमत्तेला १७ अंकी अल्फा न्यूमेरिक कोड मिळेल. पहिले दोन अंक हे राज्य आयडी असतील, पुढील एक अंक वक्फ मालमत्तेचा प्रकार, पुढचे तीन अंक जिल्हा आयडी असतील, पुढचे ७ अंक हे वक्फ मालमत्तेचा नोंदणीकृत आयडी असेल, पुढची दोन अक्षरे मालमत्तेचा उप प्रकार असतील आणि शेवटचे तीन अंक वक्फ मालमत्तेचा अनुक्रमांक असणार आहे. म्हणजेच एका आयडीमध्ये सर्व प्रकारची माहिती सामील असणार आहे.

उमीद पोर्टलमध्ये शिया, सुन्नी, बोहरा आणि आगाखानीचा पर्याय असणार आहे. याशिवाय २२ प्रकारच्या मालमत्तेचे पर्याय ठेवण्यात आले आहेत. ज्यांचे २२ कोड ड्रॉप डाउन यादीत असतील. यामध्ये शेती जमीन, आशुरखाना, दर्गा, कब्रस्तान, ईदगाह, इमामबारा, खानखाना, शाळा, मदरसा हे आणि असे २२ पर्याय असणार आहेत. यापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.