AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon 2026 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सूनबाबत सर्वात मोठी अपडेट, यंदा…

Monsoon Arrival Date : युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट्स (ECMWF) ने मान्सूनबाबत अहवाल जारी केला आहे. यातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे .

Monsoon 2026 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सूनबाबत सर्वात मोठी अपडेट, यंदा...
Monsoon Arrival DateImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 24, 2026 | 7:11 PM
Share

संपूर्ण देशात सूर्य आग ओकत आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात सध्या प्रचंड उष्णतेची लाट आहे. देशातील बहुताशी भागात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे लोक आता पावसाची वाट पाहत आहेत. अशातच आता दक्षिण-पश्चिम मान्सूनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. यावर्षी मान्सून आपल्या ठरलेल्या वेळेपूर्वी भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता

युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट्स (ECMWF) ने मान्सूनबाबत अहवाल जारी केला आहे. यानुसार, मे महिन्याच्या अखेरीस मान्सून दक्षिण भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सून सर्वप्रथम केरळमध्ये दाखल होईल आणि नंतर उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकेल. त्याआधी अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून 18 ते 25 मेदरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर तो केरळमध्ये 25 मेच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे.

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या मागितीनुसार, यावेळी मान्सून लवकर येण्यामागे अल निनोची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी असणे हे एक कारण आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल मुळेही पाऊस लवकर पडण्याची आणि मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच नागरिकांना उकाड्यापासून दिलासाही मिळण्याची शक्यता आहे.

भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान विभागाने 2026 मध्ये भारतात मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली होती. IMD च्या मते जून ते सप्टेंबर या दक्षिण-पश्चिम मान्सून हंगामात देशभरात पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) 90 ते 95 टक्के राहू शकतो. यामुळे काही भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे. तर राज्याच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत असल्याचेही समोर आले आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल