AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Updates : पावसाची प्रतिक्षा संपणार, पाहा महाराष्ट्रात कधी दाखल होणार पाऊस

पावसाची वाट बघत असलेल्या प्रत्येकाची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण यंदा मान्सून वेळेच्या आधी केरळात दाखल झाल्याने महाराष्ट्रात देखील तो लवकर दाखल होणार आहे. काय आहे पावसाची तारीख. कधीपर्यंत पोहोचणार महाराष्ट्रात जाणून घ्या.

Monsoon Updates : पावसाची प्रतिक्षा संपणार, पाहा महाराष्ट्रात कधी दाखल होणार पाऊस
| Updated on: Jun 01, 2024 | 9:57 PM
Share

मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधीच दाखल झाल्यानंतर आता लवकरच तो इतर राज्यांमध्ये पोहोचणार आहे. हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, नैऋत्य मान्सून वेळेच्या दोन दिवस आधी दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रात तो १० जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. तर १५ जूनपर्यंत तो मध्य प्रदेशात पोहोचण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून २९ मे रोजी केरळमध्ये दाखल झालाय. नैऋत्य मान्सून आणि ईशान्य मान्सून एकाच वेळी सुरुवात होत असल्याने देशाच्या सगळ्या राज्यांमध्ये तो वेळेत दाखल होतोय. यापूर्वी फक्त चार वेळा असे घडले आहे. 2017, 1997, 1995 आणि 1991 मध्ये मान्सून केरळ आणि उत्तर-पूर्व राज्यांमध्ये एकाच वेळी पोहोचला होता.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून 15 जूनपर्यंत मध्य प्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो उत्तरेकडील राज्यांमध्ये दाखल होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याची सरासरी पर्जन्यमान ९४९ मि.मी. गेल्या वर्षी 25 जून रोजी मान्सूनचे मध्य प्रदेशात आगमन झाले होते, मात्र काही वेळातच मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले.

नैऋत्य मान्सून वेळेआधी केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे जर मान्सूनचा वेग सामान्य राहिला तर तो 17 जूनच्या एक-दोन दिवस आधी दक्षिण मध्य प्रदेशात पोहोचू शकतो. 2022 मध्ये मान्सून एक दिवस आधी दाखल झाला होता आणि 21 जूनपर्यंत त्याने देशाचा बराच भाग व्यापला होता.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तो 15 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून कोणत्या राज्यात कधी दाखल होणार, हे जाणून घेऊया.

अंदमान निकोबार – 22 मे बंगालचा उपसागर – 26 मे केरळ, तामिळनाडू – 1 जून कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आसामचा काही भाग – 5 जून महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा वरचा भाग, पश्चिम बंगाल – 10 जून गुजरात आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा झारखंड आणि बिहारची सीमा – 15 जून गुजरातचा अंतर्गत भाग, मध्य प्रदेशातील मध्य भाग आणि उत्तर प्रदेशचा काही भाग – 20 जून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीर – 25 जून राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब -30 जून राजस्थान -5 जुलै

हवामान खात्याच्या माहितीनुसार, देशात यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे वेळेआधीच मान्सून भारतात दाखल झाला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण.
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक.
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया.
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?.
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर.
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान.
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने...
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने....
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी.
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!.
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?.