जगावर येणार महायुद्धापेक्षाही भयंकर संकट, चीनच्या हादरवणाऱ्या दाव्यानं बलाढ्य देशांची झोप उडाली, भारताचं काय होणार?
मोठी बातमी समोर येत आहे, चीनकडून मोठा दावा करण्यात आला आहे, एक मोठं संकट येणार असल्याचे संकेत मिळत आहेत, चीनच्या इशाऱ्यानंतर जगाची झोप उडाली आहे.

अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे चीन आणि रशियासोबत भारताची जवळीक वाढत आहे, मात्र आता चीनने केलेल्या नव्या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. चीनकडून एआयबद्दल मोठा दावा करण्यात आला आहे. जगभरातील सैन्यदल आपल्या कारवाया अधिक गतीनं आणि अचूक व्हाव्यात यासाठी आपल्या शस्त्रांमध्ये आणि ऑपरेशन्समध्ये एआयचा वापर करत आहेत. याचं ताजं उदाहारण म्हणजे जूनमध्ये इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं, या युद्धामध्ये इस्रायलकडून इराणवर हल्ला करण्यासाठी एआयचा वापर करण्यात आला होता. मात्र आया एआयबद्दल चीनने जो इशारा दिला आहे, त्यामुळे संपूर्ण जगाचा थरकाप उडाला आहे.
एआय दहशतवाद्यांना अशी शस्त्र बनवण्यासाठी मदत करू शकते, ज्यामुळे संपूर्ण जगाचा विनाश होऊ शकतो असं चीनने म्हटलं आहे. दहशतवादी भविष्यात एआयच्या (AI) मदतीनं न्यूक्लिअर मिसाईल देखील तयार करू शकतात, असंही चीनने म्हटलं आहे. त्यामुळे एआय भविष्यात मानवासाठी धोक्याची घंटा ठरू शकते असा दावा सोमवारी चीनच्या एआय सेफ्टी आणि सायबर सिक्योरिटी अधिकाऱ्यांनी केला आहे, मिसाईल आणि इतर शस्त्रा-आस्त्रांमध्ये होणारा एआयचा वापर, या संदर्भातील ज्ञान सुरक्षित न राहाता जर दहशतवाद्यांच्या हाती लागलं तर मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे न्यूक्लिअर, बायोलॉजिकल, केमिकल आणि मिसाईल यांच्यावरील कंट्रोल आपण हरवून बसू, संपूर्ण जगाला याचा मोठा धोका होऊ शकतो असं चीनने म्हटलं आहे.
संपूर्ण जग दहशतीच्या सावटाखाली
चीनने केलेल्या दाव्यानुसार एआय सारखं retrieval-augmented generation तंत्रज्ञान अर्थात इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात माहितीचा डेटा गोळा करून, त्यातून तुम्ही सहज तुम्हाला हवी असेली माहिती मिळू शकता किंवा कृती करू शकता. या तंत्रज्ञानामुळे घातक शस्त्रांच्या थेअरीच्या मुळाशी जाणं दहशतवाद्यांना सहज शक्य होणार आहे, यावर संपूर्ण जगाला विचार करावा लागेल, असा चीनने म्हटलं आहे. याचा मोठा धोका जगाला निर्माण झाला आहे, असा दावा चीनकडून करण्यात आला आहे.
