होणारी सासू जावयासोबत पळाली; सासऱ्याच्या दाव्यानं प्रकरणात मोठं ट्विस्ट, पोलिसांचा पण विश्वास बसना
अलिगढमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. होणाऱ्या जावयासोबतच महिला पळून गेली, या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट आलं आहे.

अलिगढमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. होणाऱ्या जावयासोबतच महिला पळून गेली, या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मुलीच्या लग्नाला अवघे 9 दिवस बाकी असताना होणारी सासूच जावयासोबत पळाल्यानं दोन्हीकडचे कुटुंब हवालदिल झाले आहेत. या प्रकरणात कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना अलिगढमधल्या एका गावातील आहे. या गावातील रहिवासी असलेले जितेंद्र कुमार हे बंगळुरूमध्ये नोकरी करतात. त्यांच्या मुलीचा विवाह राहुल नावाच्या तरुणासोबत ठरला होता. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी तब्बल पाच लाख रुपयांचे दागिने तयार केले होते. एवढंच नाही तर घरामध्ये दोन ते तीन लाखांची रोकड देखील होती. लग्नाला अवघे नऊ दिवस राहिले असताना होणारी सासूच आपल्या जावयासोबत पळून गेली आहे. घर सोडताना या दोघांनी घरातील सर्वा दागिने आणि पैसे देखील लंपास केले आहेत. या घटनेनं मुलीला देखील मोठा धक्का बसला आहे. दरम्यान आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे. जितेंद्र कुमार यांनी या प्रकरणात मोठा दावा केला आहे.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र कुमार
राहुलचे होणारे सासरे जितेंद्र कुमार यांनी या प्रकरणावर बोलताना असा दावा केला आहे की, राहुल आणि त्याच्या होणाऱ्या सासुचे गेल्या महिन्यात डिसेंबरपासूनच प्रेमसंबंध जुळले होते. मात्र याबाबत कोणालाच माहिती नव्हती, त्यानंतर आम्ही आमच्या मुलीचं लग्न राहुलसोबत निश्चित केलं. पण लग्नाला नऊ दिवस बाकी असतानाच ते दोघं घरातून पळून गेले. घरातून पळून जाताना ते आपल्यासोबत पाच लाखांचे दागिने आणि घरातील रोकड देखील घेऊन गेले असा दावा जितेंद्र कुमार यांनी केला आहे. पुढे बोलताना ते असं देखील म्हणाले की, मला या संदर्भात थोडा संशय होता, मात्र असं काही नसावं असं मला त्यावेळी वाटलं.
