AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका रात्रीत शेतकरी झाला मलामाल, शेतात काहीतरी चमकताना दिसलं आणि…!

आश्चर्याची बाब म्हणजे या हिऱ्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे.

एका रात्रीत शेतकरी झाला मलामाल, शेतात काहीतरी चमकताना दिसलं आणि...!
| Edited By: | Updated on: Dec 07, 2020 | 10:37 AM
Share

भोपाळ : कोणाचं नशिब कधी बदलेन काही सांगता येत नाही. असाच एक अजब प्रकार मध्य प्रदेशात समोर आला आहे. एका रात्रीत मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) राहणाऱ्या शेतकऱ्यांचं नशिब बदललं आहे. अवघ्या दोन दिवसांच्या भाकरीसाठी रात्रंदिवस काम करणारा शेतकरी एका क्षणात लक्षाधीश झाला आहे. खरंतर, पन्ना जिल्ह्यातील 45 वर्षीय शेतकरी लखन यादव (lakhan yadav) याला त्याच्या जमिनीवर एक हिरा सापडला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या हिऱ्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. (mp farmer finds rs 60 lakh diamond in patch he leased for rs 200)

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याने हिऱ्याची चौकशी केली असता तो मौल्यवान असल्याचं लक्षात आलं. यानंतर शनिवारी खनिज विभागाने 60.6 लाख रुपयांमध्ये या हिऱ्याचा लिलाव केला आहे. ते झालं असं की, गेल्या महिन्यात लखन यादव यांनी 200 रुपये भाडेतत्त्वावर ही जमीन घेतली होती. लखनला त्याच्या जमिनीवर काही चमकणारी वस्तू दिसली ज्यामध्ये खोदताना 14.98 कॅरेटचा हिरा सापडला.

‘या हिर्‍याने माझे आयुष्य बदलले आहे, हा क्षण कधीही विसरणार नाही’

लखन यांच्या म्हणण्यानुसार, या हिऱ्याने माझे आयुष्य बदलले आहे. मी जेव्हा शेतात काहीतरी चमकताना पाहिलं तेव्हा तो क्षण मी कधीही विसरणार नाही. हिऱ्यावरची धूळ काढल्यानंतर माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. खरंतर, हिरा पाहिल्यानंतर माझ्या हृदयाची धडधड सुरू झाली होती.

यानंतर लखनने त्याची ही कहाणी सोशल मीडियावरही शेअर केली होती. नेटकऱ्यांनी याला खूप पसंती दिली आहे. त्याचा एक फोटोही यामध्ये व्हायरल झाला आहे. आता या पैशांचं काय करणार असा प्रश्न विचारला असता मी अशिक्षित आहेत. त्यामुळे मी माझ्या चार मुलांचे चांगले शिक्षण करण्यासाठी या पैशांचा वापर करणार असल्याचं लखन म्हणाला. (mp farmer finds rs 60 lakh diamond in patch he leased for rs 200)

इतर बातम्या – 

Farmers Protest | शेतकऱ्यांसाठी 30 खेळाडू मैदानात, राष्ट्रपतींकडे पुरस्कार परत करणार!

Bharat Bandh : उद्या नाही मिळणार दूध-फळ आणि भाज्या, फक्त ‘या’ सेवा राहणार सुरू

(mp farmer finds rs 60 lakh diamond in patch he leased for rs 200)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.