Mukesh Ambani:हे माहीत आहे का? मुकेश अंबानी आंब्याचे मोठे निर्यातदारही, 600 एकराची बाग आणि 1,50000 आंब्यांची झाडं

या बागेत केशर, हापूर, रत्ना, सिंधू, नीलम आणि आम्रपाली सारख्या आंब्यांच्या देशातील जाती आहेतच, त्यासह परदेशातील काही आंब्यांचे प्रकारही इथे लावण्यात आले आहेत. त्यात अमेरिकेच्या फ्लोरिडातील टॉमी एटकिन्स, इस्रायलमधील लिली, केईट आणि माया यासारख्या आंब्यांचे प्रकार आहेत.

Mukesh Ambani:हे माहीत आहे का? मुकेश अंबानी आंब्याचे मोठे निर्यातदारही, 600 एकराची बाग आणि 1,50000 आंब्यांची झाडं
Relaince mango exporter
Image Credit source: social media
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

Jul 02, 2022 | 3:22 PM

जामनगर – रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance industries)देशातील सर्वात मोठी आणि मूल्यवान कंपनी आहे. या कंपनीचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे भारतातील आणि आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्सचा बिझनेस इतरही अनेक क्षेत्रात विस्तारलेला आहे. यात पेट्रोलियम, टेलिकॉम आणि रिटेल क्षेत्र आहेत. याची माहिती अनेकांना आहे. मात्र या जामनगरच्या रिलायन्स कंपनीत आंब्यांची बाग आहे आणि ती थोडीथोडकी नाही तर 600 एकरवर पसरलेली आहे, हे फारसे कुणाला माहित नसेल. या बागेत आंब्यांची दीड लाखांहून अधिक झाडे आहेत. या बागेत 200 देशी-विदेशी आंब्यांचे प्रकार आणि झाडे आहेत. यातील काही कलमांची गणना ही जगातील अत्यंत चांगल्या दर्जाच्या आंब्यांमध्ये होते. या आंब्यांच्या व्यवसायात मुकेश अंबानी (Mango Exporter)कसे उतरले हेही जाणून घेऊयात.

प्रदूषण रोखण्यासाठी लावली आंब्याची बाग

गुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्सची रिफायनरी आहे. ही रिफायनरी जगातील क्रमांक 1 ची रिफायनरी मानली जाते. यातून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी रिलायन्सने आंब्यांची बाग लावली आहे. रिलायन्सला हे खुशीने करावे लागलेने नाही, तर पर्यावरणांच्या नियमांमुळे ही बाग उभी करावी लागली असेही सांगण्यात येते. 1997 साली प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या वतीने कंपनीला अनेक नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलण्याचे कंपनीने ठरवले. त्यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढवली. यातून पर्यावरण रक्षणासोबतच, कंपनीला त्याचा फायदा कसा होईल हेही पाहण्यात आले. यातून 600 एकरवर आंब्यांची बाग करण्यात आली.

1998 सालापासून सुरु केले प्रयत्न

जामनगरमध्ये असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ओसाड जमिनीवर ही आंब्याची बाग सुरु करण्याची प्रक्रिया 1998 साली सुरु झाली. सुरुवातीला या ओसाड जमिनीवर हा प्रकल्प कितपत यशस्वी होईल, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. जामनगर हा वाळवंटी प्रदेशाजवळचा भाग आहे. तिथे खारे पाणी आहे आणि हवाही जोरात वाहते. मात्र कंपनीने तंत्रज्ञानाचा वापर करत हा प्रकल्प यशस्वी करुन दाखवला. या बागेचं नावही कंपनीचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या नावावरुन धीरुभाई अंबानी लखीबाग अमराई असे देण्यात आले आहे.

600 एकरावर जगातील सर्वात मोठी आंब्यांची बाग

ही आंब्यांची बाग 600 एकर परिसरात पसरलेली आहे. जगातील आंब्यांच्या बागांपैकी ही सर्वात मोठी बाग मानली जाते. कंपनीच्या डिसैलिटेशन प्लँटमधून यासाठी पाणी येते. या प्लँटमध्ये समुद्रातील येणारे पाणी स्वच्छ करण्यात येते. पाण्याची कमतरता असल्याने या बागेत वॉटर हार्वेस्टिंग आणि डीप इरिगेशन यासारख्या पद्धतींचा भरपूर वापर करण्यात आला आहे. या बागेत केशर, हापूर, रत्ना, सिंधू, नीलम आणि आम्रपाली सारख्या आंब्यांच्या देशातील जाती आहेतच, त्यासह परदेशातील काही आंब्यांचे प्रकारही इथे लावण्यात आले आहेत. त्यात अमेरिकेच्या फ्लोरिडातील टॉमी एटकिन्स, इस्रायलमधील लिली, केईट आणि माया यासारख्या आंब्यांचे प्रकार आहेत.

अनेक देशांमध्ये होते निर्यात

या बागेत तयार होणारे आंबे हे अनेक देशात निर्यात करण्यात येतात. जामनगरच्या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांनाही या बागेत वापरण्यात येत असलेल्या तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाते आहे. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना एक लाख आंब्यांची कलमेही वितरीत केली जातात. या बागेत तयार होणाऱ्या आंब्यांची मागणी परदेशात राहणाऱ्या गुजराथी समाजात प्रचंड असल्याची माहिती आहे. धीरुभाई अंबानी आणि मुकेश अंबानी हेही आंबाप्रेमी असल्याचे सांगण्यात येते.

हे सुद्धा वाचा

आंब्यासाठी आणि इतर फळांसाठी स्वतंत्र कंपनी

जामनगरच्या 7500 एकरात ही रिफायनरी पसरलेली आहे. यातील 1627 एकर हा ग्रीन बेल्ट म्हणून ओळखण्यात येतो. यात 34 हून अधिक निरनिराळ्या प्रकारची झाडे आहेत. यातील 10 टक्के आंब्याची झाडे आहेत. आंब्यांव्यतिरिक्त चिंच, काजू, ब्राझिलियन चेरी, चिकू यासोबत काही औषधीय वनस्पतीही या ठिकाणी आहेत. यात प्रतिएकर आंब्याचे उत्पादन 10 मेट्रिक टन इतके आहे. जे ब्राझील आणि इस्रायलहूनही अधिक मानण्यात येते. या बागेत तयार होणाऱ्या फळांसाठी रिलायन्सने वेगळी कंपनी तयार केली आहे. त्यातून मार्केटिंग आणि विपणन करण्यात य़ेते. जामनगर फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आयआयेल मँगो या ब्रँड नावाने हे आंबे विकतात.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें