वक्फ बिलाच्या विरोधात मुर्शिदाबाद जळतेय, माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याचा चहा पितानाचा फोटो झाला व्हायरल, राजकीय हंगामा
युसुफ पठाण यांच्या पोस्टवरुन कळते की वास्तविक ते मुर्शिदाबाद पासून खुप दूर आहेत. शारीरिक आणि मानसिक दोन्ही रुपांनी..अनेक लोकांनी हा संशय व्यक्त केला की त्यांना मुर्शिदाबाद येथे काय चालू आहे याची कल्पना तरी आहे का? असा सवाल केला जात आहे.

मुर्शिदाबादमध्ये वक्फ बिला विरोधात निदर्शनामुळे हिंसा उसळली आहे. यावरुन राज्य सरकारवर टीका होत आहे. आणि त्यात खासदार सांसद यूसुफ पठान एका निवांत क्षणी चहाचा आनंद घेतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे जनता या फोटोने संतप्त झाली आहे. कारण ज्या भागात हा हिंसाचार सुरु आहे तो युसूफ पठाणचा मतदार संघ आहे. विरोध पक्षाला हे आयतेच हत्यार मिळाले आहे,पण काही तृणमुल पक्षाच्या नेत्यांनीही पठाण यांच्या पोस्टवर तोंडसुख घेतले आहे. हिंसेत तीन लोकांचा मृत्यू झाला असून इंटरनेट सेवा ठप्प आहेत.
वक्फ बिलाच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे निदर्शने सुरु आहेत. या निदर्शनाच्या वेळी शनिवारी येथे बापलेकाची हत्या जमावाने केल्याची घटना घडली आहे. आतापर्यंत तीन जण दगावले गेले आहेत.बहरामपुर, सुती, शमसेरगंज, धुलियान आणि जंगीपुर येथे मोठ्या प्रमाणावर हिंसा झालेली आहे. मुर्शिदाबादच्या हिंसेप्रकरणात कोलकाता हायकोर्टाने हस्तक्षेप करुन तेथे केंद्रिय सुरक्षा दलाला पाचारण करण्याचे आदेश दिले होते. अशात मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बरहरामपूर येथील तृणमुल काँग्रेसचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण कुठे आहेत ? असा सवाल केला जात होता.
हिंसाचाराने स्वत:चा मतदार संघ पोळला जात असताना युसुफ पठाण यांनी इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला. फोटोत युसूफ पठाण झाडांनी वेढलेल्या शांत वातावरणात उघड्या आभाळाखाली झाडांच्या सानिध्यात उभे आहेत. त्यांनी सुस्त दुपारी चहाचे घोट घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी पोस्टवर कॅप्शन लिहीलंय की सुखद दुपार, चांगला चहा आणि शांत वातावरण , बस या क्षणाचा आनंद घेत आहे.
युसूफ पठाण यांच्या या पोस्टने नंतर राजकीय कलुगीतुरा सुरु झाला आहे. कारण त्यांची वेळ चुकली आहे. कारण या क्षणी युसुफ पठाण यांच्या मतदार संघात हिंसक निदर्शने सुरु आहेत.
आतापर्यंत तीन जण ठार
वक्फ बिलावरुन निदर्शने सुरु असताना मुर्शिदाबाद येथे स्थिती एवढी बिघडली की पोलिसांना गोळीबार करावा लागला आहे. मुर्शिदाबाद येथे गेल्या मंगळवार ८ एप्रिलपासून हिंसाचार सुरु आहे. पहिली हिंसा जंगीपूरात वक्फ विधेयकाविरोधात निदर्शने सुरु असताना हिंसाचार भडकला आहे. त्यानंतर हळूहळू हे लोन सुती आणि शमसेरगंज येथेपर्यंत पसरले आहे. मुर्शिदाबाद येथील मोठ्या भागातील इंटरनेट सेवा बंद करावी लागली आहे. शुक्रवारी हिंसाचारानंतर लोकांना हुसकवून लावण्यासाठी पोलिसांनी चार राऊंड फायर करावे लागले आहेत. यात एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यात बापलेकाचा मृत्यू झाला.
अनेक जण खासदाराच्या ‘आरामदायक दुपार’च्या पोस्टवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. पोस्टवर एकामागून एक प्रतिक्रिया येत आहेत. तुम्हाला मुर्शिदाबाद येतील बातम्या मिळत आहेत का? योगायोग म्हणजे शुक्रवारीच हिंसाचार उसळला आणि इंस्टाग्रामवर चहाचे घोट घेतानाचा युसुफ पठाण यांचा फोटो पोस्ट झाला. त्यांनी या पोस्टवर एक इंग्रजी गाणे देखील शेअर केले आहे.
येथे पाहा पोस्ट –
View this post on Instagram
यानंतर युसुफच्या पोस्टवर विरोधक आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी टीका केली आहे. तृणमुल काँग्रेसमधील काही लोकांनी बाहेरील खासदारावर तोंडसुख घेतले आहे. युसुफ पठाण यांना बहरामपुर येथून पाच वेळा जिंकलेल्या काँग्रेसचे खासदार अधीर चौधीर यांच्या विरोधात उतरवले होते. बाहेरुन आलेले असे स्टार आणि कलाकार पश्चिम बंगालमध्ये निवडणूका जिंकत आहेत. परंतू त्यातील अनेक जण लोकांमध्ये वावरत नाहीत अशी टीका केली जात आहे.
भाजपा नेते सुकांत मजूमदार यांची टीका
युसुफ पठान कोण आहे? एक क्रिकेटर.राजकीय व्यक्ती नाहीत. तृणमूलने त्यांना बहरामपुरमधून तिकीट का दिले? केवळ त्यांच्या धार्मिक ओळखीचा उपयोग करण्यासाठीच ना. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की युसुफ राजकारण किंवा मुर्शिदाबादच्या सर्व सामान्य लोकांच्या जीवनाशी काही संबंध उरलेला नाही अशी टीका भाजपाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते शमिक भट्टाचार्य यांनी केली आहे.
