AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘त्या’ घोषणेला मुस्लिम उलेमांचा विरोध, काय आहे प्रकरण?; चंद्रयानशी कनेक्शन काय?

काँग्रेसने नामकरणाला विरोध केलेला नाही. मोदी जिकडे जातात तिकडे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. पण मोदींनी दिलेल्या नावांना आमचा विरोध नाहीये. पण चांद्रयानाचं सर्व यश हे शास्त्रज्ञांचंच आहे, असं काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'त्या' घोषणेला मुस्लिम उलेमांचा विरोध, काय आहे प्रकरण?; चंद्रयानशी कनेक्शन काय?
pm modi Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 26, 2023 | 2:52 PM
Share

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : भारताचं चंद्रयान मिशन यशस्वी झालं आहे. विक्रम लँडरने चंद्रावर पाऊल ठेवून आपलं कामही सुरू केलं आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारत हा अंतराळातील एक मोठी शक्ती म्हणून उदयास आल्याचंही जगभरातून सांगितलं जात आहे. अगदी पाकिस्तानातील नागरिकांनीही भारताच्या या कामगिरीवर आनंद व्यक्त करत भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, भारतातील मुस्लिम उलेमांनी एका गोष्टीला विरोध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी एक मोठी घोषणा केली आणि त्याला या उलेमांनी विरोध सुरू केला आहे.

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी मोठी कामगिरी बजावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. चांद्रयान यशस्वी झालं तेव्हा मोदी परदेशातून होते. दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावर होते. आज सकाळी ते ग्रीसवरून थेट बंगळुरूत आले. बंगळुरूतून ते थेट इस्रोच्या स्टेशनमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. तसेच त्यांच्याशी संवाद साधला. इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांच्याशी गळाभेटही केली. त्यानंतर त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला.

मोदींच्या तीन घोषणा

यावेळी मोदींनी तीन मोठ्या घोषणा केल्या. चांद्रयान-3 चंद्रावर ज्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणाला शिवशक्ती असं नाव देण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच चांद्रयान-2 चंद्रावर ज्या ठिकाणी पोहोचलं होतं त्या ठिकाणाला तिरंगा असं नाव देण्यात येत आहे. याशिवाय 23 ऑगस्ट रोजी आपलं मिशन यशस्वी झालं होतं. त्यामुळे 23 ऑगस्ट हा दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

नेमक्या त्याच घोषणेवर नाराजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-3 हे चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं त्या भागाला मोदी यांनी शिवशक्ती हे नाव देण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील ऑल इंडिया मुस्लिम जमातने हा विरोध केला आहे. या जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांनी भारताने चंद्रावर पाऊल ठेवलं ही अभिमानाची गोष्ट आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे सर्वच भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पण लँडिंग पॉइंटला शिवशक्ती नाव दिल्याने आम्ही नाराज आहोत, असं बरेलवी यांनी म्हटलं आहे. शिवशक्ती या नावाला जग आणि भारतातील अनेक लोकांचा आक्षेप असेल. चंद्राच्या पॉइंटला दिलेलं कोणत्याही देवी देवतांचं नाव त्यांना आवडणार नाही. अशा प्रकारचं नाव देता कामा नये, असं बरेलवी म्हणाले.

भारत, इंडिया आणि हिंदुस्थान हे नाव द्या

तर, आपल्या देशाने मोठं यश मिळवलं आहे. हे यश देशाचं यश आहे. पण चंद्रावरील पॉइंटला शिवशक्तीच्या ऐवजी वेगळं नाव ठेवायला हवं, असं शिया समाचे मौलाना सैफ अब्बास नकवी यांनी सांगितलं. त्यांनी शिवशक्तीऐवजी लँडिंग पॉइंटला भारत किंवा इंडिया नाव देण्याचा सल्लाही दिला. इंडियाच्या नावाने तिरंगा फडकतो. हा पॉइंट देशाच्या नावाने समर्पित झाला पाहिजे. देशाच्या 140 कोटी जनतेला अभिमान वाटतो. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीने हे शक्य झालं आहे. चंद्रावरील पॉइंटला भारत, इंडिया आणि हिंदुस्थान हे नाव दिलं पाहिजे. यापेक्षा अधिक चांगलं नाव काय असू शकतं? असा सवालही त्यांनी केला.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.