Bihar Election | बिहारचा रणसंग्राम शिगेला, पंतप्रधान मोदी-राहुल गांधींच्या सभांचा धडाका, एकाच दिवशी 5 सभा

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधींच्या प्रचार सभांचा धडाका सुरु होणार आहे. नरेंद्र मोदी दिवसभरात तीन सभांना संबोधित करतील तर राहुल गांधी दोन सभांना संबोधित करणार आहेत. (Narendra Modi, Rahul Gandhi starts political campaign for Bihar elections from tomorrow)

Bihar Election | बिहारचा रणसंग्राम शिगेला, पंतप्रधान मोदी-राहुल गांधींच्या सभांचा धडाका, एकाच दिवशी 5 सभा

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधींच्या प्रचार सभांचा धडाका सुरु होणार आहे. नरेंद्र मोदी दिवसभरात तीन सभांना संबोधित करतील तर राहुल गांधी दोन सभांना संबोधित करणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 28 तारखेला होणार आहे. (Narendra Modi, Rahul Gandhi starts political campaign for Bihar elections from tomorrow)

भाजप आणि जदयु एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बिहारमध्ये डेरही ऑन सोन, गया आणि भागलपूर येथे प्रचारसभा घेतील, यावेळी त्यांच्यासोबत नितीश कुमार उपस्थित राहणार आहेत. गया येथील सभेत नरेंद्र मोदींसोबत जदयुचे खासदार राजीव रंजन देखील उपस्थित असतील.

राहुल गांधी काँग्रेस आणि राजदच्या महाआघाडीच्या प्रचारासाठी सभा दोन सभा घेणार आहेत. शुक्रवारी राहुल गांधी नवादा मधील हिसुआ आणि भागलपूरमधील कहलगावमध्ये सभा घेतील. महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव देखील राहुल गांधीच्या सभेत उपस्थित राहतील.

भाजप आणि जदयु युतीकडून दिग्गज नेत्यांनी प्रचाराचा जोर लावला जात आहे. अमित शाह, जे.पी नड्डा, योगी आदित्यनाथ यांच्यासह मोठे नेते भाजपसाठी प्रचार करत आहेत. तर जदयूसाठी नितीशकुमार स्टार प्रचारक आहेत.

राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या प्रचार संभांना देखील मोठा प्रतिसाद मिळत असून दिवसाला 7 ते 8 सभा घेत आहेत. महाआघाडीचे ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत.

दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.

मागील दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत होती. कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, कोणतीही अडचण नाही, मागील दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. सध्या पाटणामधील एम्स रुग्णालयात दाखल झालो असून सीटीस्कॅन रिपोर्ट नॉर्मल आल्याची माहिती सुशीलकुमार मोदींनी दिली.

संबंधित बातम्या:

सत्ता दिल्यास मोफत लस देऊ; बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपचं आश्वासन

बिहार विधानसभा निवडणुकीतील तीन कट्टर विरोधक एकत्र! काय आहे कारण?

(Narendra Modi, Rahul Gandhi starts political campaign for Bihar elections from tomorrow)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *