AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नसिरुद्दीन शाह म्हणाले, आम्ही 20 कोटी, घाबरणार नाही, भिडू, लढू, मोघलांबाबतही वादग्रस्त बोलले?

आम्ही इथेच जन्मलोत. आमच्या कित्येक पिढ्या इथेच जन्मल्या आणि गेल्या. आणि मला खात्रीय, की जर कुणी असा मुस्लिमांविरोधात प्रयत्न केलाच तर त्याचा प्रचंड विरोध केला जाईल. ती प्रतिक्रिया संतप्त असेल.

नसिरुद्दीन शाह म्हणाले, आम्ही 20 कोटी, घाबरणार नाही, भिडू, लढू, मोघलांबाबतही वादग्रस्त बोलले?
आम्ही 20 कोटी, लढू असं वक्तव्य अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केलं आहे.
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 3:44 PM
Share

छत्तीसगडच्या धर्म संसदेत काही कथित साधूंनी आक्रस्तळेपणा करत मुस्लिमांच्याविरोधात घोषणा दिल्या. फक्त मुस्लिमच नाही तर अकोल्याच्या कालीचरण महाराजांसारख्यांनी तर महात्मा गांधींनाही सोडलं नाही. राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्याला हात जोडून नमन केलं गेलं. त्याच धर्मसंसदेत केलेल्या भाषणाचे आता पडसाद उमटायला सुरुवात झालीय. त्यातली सर्वात चर्चेतली प्रतिक्रिया आलीय ती ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची (Nasiruddin Shah). द वायर ह्या यू ट्यूब चॅनलसाठी प्रसिद्ध पत्रकार करन थापर यांनी ही मुलाखत घेतलीय. ह्या मुलाखतीत नसिरुद्दीन शाह यांनी लढण्या भिडण्याची भाषा केलीय.

नेमकं काय म्हणाले नसिरुद्दीन शाह? धर्मसंसदेतल्या वादग्रस्त वक्तव्यावर थापर यांनी नसिरुद्दीन शाह यांना बोलतं केलं. त्यातल्या एका प्रश्नावर उत्तर देताना शाह म्हणाले- मला आश्चर्य वाटतं की, या लोकांना ते काय बोलतायत हे तरी कळतं की नाही. कारण ते जे काही बोलण्याचं प्रयत्न करतायत ते एक फुल्ल स्केल नागरी युद्ध आहे. मुस्लिमांना भयभीत करण्याचे, घाबरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण आम्ही मुस्लिम 20 कोटी (200 मिलियन) आहोत. हा आकडा खूप साधा का वाटतो? आम्ही 20 कोटी लढू, आम्हा 20 कोटी मुस्लिमांचा ह्याच देशावर दावा आहे, आम्हा 20 कोटींसाठी हीच मातृभूमी आहे. आम्ही इथेच जन्मलोत. आमच्या कित्येक पिढ्या इथेच जन्मल्या आणि गेल्या. आणि मला खात्रीय, की जर कुणी असा मुस्लिमांविरोधात प्रयत्न केलाच तर त्याचा प्रचंड विरोध केला जाईल. ती प्रतिक्रिया संतप्त असेल.

मोघल राष्ट्रनिर्माते दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात नसिरुद्दीन शाह म्हणाले-मोघलांनी केलेले अत्याचार पुन्हा पुन्हा हायलाईट केले जातात. पण मोघलांचं राष्ट्रनिर्मितीतलं योगदान विसरलं जातं. मोघलांनीच ऐतिहासिक स्मारके निर्माण केली. गौरवशाली इतिहास त्यांनी दिला. संगीत, साहित्य, सांस्कृतिक, नृत्य, गायिकी, चित्रकला यांच्या परंपरा मुस्लिमांनी निर्माण केल्या. तैमूरबद्दल कुणी बोलत नाही, नादीर शाह बद्दलही कुणी बोलत नाही, गजनीही नाही कारण ते इतिहासाशी सुसंगत नाहीत. ते आले आणि लुटून गेले. पण मोघल ह्या देशात आले आणि त्यांनी ही भूमी त्यांची केली. त्यांना हवं तर तुम्ही रेफ्यूजी म्हणू शकता. आणि मुस्लिम शासकांनी केलेल्या अत्याचाराबाबत आज प्रत्येक मुसलमानाला जबाबदार धरणे हे हास्यास्पद आहे.

नसिरुद्दीन शाह आणखी काय म्हणाले? नसिरुद्दीन शाह यांची ही मुलाखत अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळाची आहे. ह्याच मुलाखतीत शाह म्हणाले की, मला माझ्या मुलाबाळांचं काय होईल याची काळजी वाटते. माझा काळ तसा आता फार राहीलेला नाही. पुढचा दशकभर त्यांनी स्वत:साठी दिलंय. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर नसिरुद्दीन शाह यांनी काही टिकाटिप्पणी केली होती. त्यावरही वाद निर्माण झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा नसिरुद्दीन शाहांच्या लढण्याच्या भाषेनं वाद होतोय. ट्विटरवर हा ट्रेंड आहे.

हे सुद्धा वाचा:

Yoga Poses : 2022 वर्षाची निरोगी सुरुवात करण्यासाठी नियमित ‘ही’ 5 योगासने करा!

ओमायक्रॉनने बँकांना धडकी, कर्ज वसुलीला ब्रेक लागण्याची शक्यता, बँक NPA 9 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज 

Ratan Tata : टाटांच्या वाढदिनी केक, टाळ्याही वाजवल्या, पाठही थोपटली, पण हे सगळं करणारा तो तरुण कोण?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.