AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी महिला गुप्तचराच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला नौदलाचा जवान, गुप्त माहिती पुरवत होता…

सीमेपलिकडून महिला गुप्पचरांचा वापर करुन हनी ट्रॅप लावले जात असून यात आता आणखीन एक भारतीय नौदलाचा जवान अडकल्याचे स्पष्ट झाले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानी महिला गुप्तचराच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला नौदलाचा जवान, गुप्त माहिती पुरवत होता...
Navy personnel arrested
| Updated on: Oct 04, 2026 | 7:33 PM
Share

भारतीय सैनिक पाकिस्तानच्या महिला गुप्तचरांच्या जाळ्यात अडकण्याच्या घटनात अलिकडे वाढ झाली आहे. आता ताजे प्रकरण भारतीय नौदलाचे नाविक प्रदीप मुखर्जी यांना पाकिस्तानी गुप्तचर एजंटना गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. आंध्रप्रदेश पोलिसांच्या काऊंटर इंटेलिजन्स सेलने ३ ऑक्टोबर रोजी कोयंबटूर स्थित INS अग्रणीवरुन या प्रदीप मुखर्जी यांना अटक केली आहे.

आंध्रप्रदेशातील पोलिसांच्या काऊंटर इंटेलिजन्स ( CI )  सेलने ३ ऑक्टोबर रोजी ३१ वर्षीय प्रदीप मुखर्जी यांना कोयंबटुर येथील INS अग्रणी येथून अटक केली आहे. INS अग्रणी नौदलाची लिडरशिप ट्रेनिंगशी संबंधित सुविधा आहे. प्रदीप मुखर्जी पश्चिम बंगालच्या राहणारे आहेत. आणि २०१४ मध्ये भारतीय नौदलात सामिल झाले होते. ते विशाखापत्तनम स्थित ईस्टर्न नेव्हल कमांड मध्ये तैनात होते.

अटक झाली तेव्हा प्रदीप मुखर्जी कोयंबतूर येथील या सुविधात मॅनेजमेंट डेव्हलपमेंटचा कोर्स करत होते. ते एक आठवड्यापासून तेथे उपस्थित होते. अधिकृत सूत्रांच्या मते एका पाकिस्तानी गुप्तचर एजंटने काही महिन्या आधी प्रदीप मुखर्जी यांच्याशी संपर्क केला होता.

हळूहळू या महिला एजंटने ऑनलाईन नात्याचा वापर करुन प्रदी मुखर्जी याच्याकडून संवेदनशील माहिती मिळवली. यात महत्वाच्या संवदनशील नौदलाच्या मालमत्ता, नौदलाच्या ताफ्याची माहिती, विशाखापत्तनम येथील नौदलाच्या अड्ड्यासंबंधित महत्वाची माहिती याचा समावेश आहे.

संशयास्पद डिजिटल कारवाईने गुपित उघड

काऊंटर इंटेलिजन्स सेल हे सीमेपलिकडील गुप्तचर आणि अतिरेकी संकटांचा मुकाबला करणारे स्पेशलस सेल आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या काऊंटर इंटेलिजेंस सेलने नौदल कर्मचाऱ्याच्या संबंधित संशयित डिजिटल फुटप्रिंटचा छडा लावल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यानंतर प्रदीप मुखर्जी याच्यावर पाळत ठेवण्यात आली. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे ३ ऑक्टोबर रोजी प्रदीप मुखर्जी कोयंबतूर येथून अटक करण्यात आली आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात